Join us  

RBI चा नवा नियम लागू; आता बनावट नोटा चालणार नाहीत! जाणून घ्या काय आहे हा नियम?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 2:04 PM

RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नवा नियम लागू केल्यानंतर, बनावट नोटा चलनातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. येत्या काळात बनावट नोटा पूर्णपणे बंद होतील, अशी अपेक्षा आहे. 

नवी दिल्ली : अनेकदा अजाणतेपणाने आपणही बनावट नोटांमध्ये व्यवहार करत असतो. कारण, एकतर आपण वेळे अभावी नोट निरखून बघत नाही आणि अनेकदा बनावट नोट ओळखायची कशी हे आपल्याला माहीत नसते. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नवा नियम लागू केल्यानंतर, बनावट नोटा चलनातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. येत्या काळात बनावट नोटा पूर्णपणे बंद होतील, अशी अपेक्षा आहे. 

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी सांगितले की, नाणी काढण्याच्या मशीनमध्ये बनावट नोटा टाकल्या जात असल्याच्या घटना पाहता यूपीआय (UPI) आधारित पर्यायाचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मशिन्समध्ये टाकण्यात येणारे पैसे अनेक प्रकरणांमध्ये बनावट असल्याचे आढळून आल्याने अडचण निर्माण झाली. त्यामुळे हा मुद्दा चर्चेचा बनला होता.

नवीन प्रणालीमुळे नाण्यांच्या वितरणात होईल सुधारणा हे पाहता आरबीआयने दुसऱ्या पर्यायावर विचार सुरू केला आहे. बरेच लोक मोबाईल वापरतात, ज्याद्वारे 'क्यूआर' कोड 'स्कॅन' केला जाऊ शकतो, जो UPI शी लिंक केला जाऊ शकतो. याद्वारे भौतिक पद्धतीने पैशांचा वापर न करता व्हेंडिंग मशीनमधून नाणी काढता येतात. देशातच मशीन विकसित झाली आहे. या नव्या प्रणालीमध्ये नाण्यांच्या वितरणात सुधारणा होणार आहे, असे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी सांगितले.

खात्यातून पैसे कापून आरबीआय नाणी देईलतत्पूर्वी, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 'क्यूआर' कोडवर आधारित 'कॉइन वेंडिंग मशीन'वर (QCVM) पायलट प्रोजेक्ट सुरू केला. आरबीआय 12 शहरांमध्ये 'क्यूआर' कोड आधारित नाणे वितरणासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. ही व्हेंडिंग मशीन UPI ​​वापरून बँक ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापून नाणी पुरवतील. सध्या उपलब्ध असलेल्या मशीनमध्ये बँक नोटा टाकून नाणी काढली जातात.

पडताळणीची आवश्यक नाहीकॅश कॉईन व्हेंडिंग मशीनमध्ये भौतिकरित्या पैसे टाकण्याची आणि त्याची पडताळणी करण्याची गरज नाही, असे शक्तीकांत दास म्हणाले, सुरुवातीला 12 शहरांमध्ये 19 ठिकाणी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याची योजना आहे. रेल्वे स्टेशन, शॉपिंग मॉल्स, मार्केट या ठिकाणी ही मशीन बसवण्यात येणार आहेत. याचबरोबर टी रविशंकर म्हणाले की, आरबीआयला एक विचित्र समस्या भेडसावत आहे. एकीकडे, नाण्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना साठवण्यासाठी अधिक जागा आवश्यक आहे. तसेच त्याचे योग्य वितरणही होत नाही.

बनावट नोट म्हणजे काय?बनावट नोटेसाठीचा शास्त्रीय, कायदेशीर शब्द आहे - फेक इंडियन करन्सी नोट म्हणजे एफआयसीएन. आणि एफआयसीएन म्हणजे 'सरकारच्या कायदेशीर मान्यतेशिवाय निर्माण केलेली चलनी नोट.' भारतात नोटा छापण्याचा परवाना मध्यवर्ती बँक म्हणून फक्त भारतीय रिझर्व्ह बँकेला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही छापलेली नोट चलनात वापरली जाऊ शकत नाही. अशी नोट छापणं किंवा ती वापरणं हे दोन्ही गुन्हे आहेत.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकपैसाव्यवसाय