Lokmat Money > बिझनेस न्यूज > RBI देऊ शकते दिलासा, रेपो रेट ६.५ टक्के कायम राहण्याची शक्यता; ८ डिसेंबरला काय होणार?

RBI देऊ शकते दिलासा, रेपो रेट ६.५ टक्के कायम राहण्याची शक्यता; ८ डिसेंबरला काय होणार?

यापूर्वी रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कोणताही बदल केला नव्हता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 09:34 AM2023-12-06T09:34:37+5:302023-12-06T09:38:17+5:30

यापूर्वी रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कोणताही बदल केला नव्हता.

RBI may give relief repo rate likely to remain at 6 5 percent What will happen on December 8 governor shaktikanta das | RBI देऊ शकते दिलासा, रेपो रेट ६.५ टक्के कायम राहण्याची शक्यता; ८ डिसेंबरला काय होणार?

RBI देऊ शकते दिलासा, रेपो रेट ६.५ टक्के कायम राहण्याची शक्यता; ८ डिसेंबरला काय होणार?

रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा रेपो दराबाबत दिलासा देण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा रेपो दर स्थिर ठेवू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. क्रेडिट रेटिंग एजन्सी आणि बँक ऑफ बडोदाच्या अर्थतज्ज्ञांनी यासंदर्भात आपलं मत व्यक्त केलंय.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतधोरण समितीच्या बैठकीत (MPC) रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याची शक्यता आहे आणि या आर्थिक वर्षात त्यात कोणताही बदल होणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून ८ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ८ डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास या बैठकीतील निर्णयांची माहिती देतील.

दोन महिन्यांनी बैठक
पतधोरण समितीची बैठक दर दोन महिन्यांनी होते. या आर्थिक वर्षाची पहिली बैठक एप्रिलमध्ये झाली. तर गेल्या आर्थिक वर्षात रेपो दरात ६ वेळा २.५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीमध्ये सहा सदस्य असतात. त्यात रिझर्व्ह बँकेचे आणि बाहेरील असे दोन्ही अधिकारी असतात.

महागाईचा कसा परिणाम होतो?
महागाईचा थेट संबंध पर्चेसिंग पॉवरशी असतो. उदाहरणार्थ, जर महागाईचा दर ७ टक्के असेल, तर कमावलेले १०० रुपये फक्त ९३ रुपये असतील. त्यामुळे महागाई लक्षात घेऊनच गुंतवणूक केली पाहिजे. अन्यथा तुमच्या पैशाचं मूल्य कमी होईल.

Web Title: RBI may give relief repo rate likely to remain at 6 5 percent What will happen on December 8 governor shaktikanta das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.