Lokmat Money > बिझनेस न्यूज > घर किंवा कार खरेदीसाठी सध्याची योग्य वेळ की थोडं थांबावं? HSBC चा रिपोर्ट काय सांगतो वाचा...

घर किंवा कार खरेदीसाठी सध्याची योग्य वेळ की थोडं थांबावं? HSBC चा रिपोर्ट काय सांगतो वाचा...

सणासुदीच्या काळात लोकांचा घर किंवा कार खरेदीकडे ओढा असतो. यंदाही लोकांचा खरेदीकडे कल वाढल्याचं दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 06:23 PM2022-10-13T18:23:08+5:302022-10-13T18:24:39+5:30

सणासुदीच्या काळात लोकांचा घर किंवा कार खरेदीकडे ओढा असतो. यंदाही लोकांचा खरेदीकडे कल वाढल्याचं दिसून येत आहे.

rbi may raise repo rate by 50 bps on higher inflation | घर किंवा कार खरेदीसाठी सध्याची योग्य वेळ की थोडं थांबावं? HSBC चा रिपोर्ट काय सांगतो वाचा...

घर किंवा कार खरेदीसाठी सध्याची योग्य वेळ की थोडं थांबावं? HSBC चा रिपोर्ट काय सांगतो वाचा...

सणासुदीच्या काळात लोकांचा घर किंवा कार खरेदीकडे ओढा असतो. यंदाही लोकांचा खरेदीकडे कल वाढल्याचं दिसून येत आहे. तर असेही काही लोक आहेत की जे अजूनही घर किंवा कार खरेदीसाठीचा योग्य वेळ कोणती याची रणनिती आखत आहेत. काहीजण चांगल्या ऑफर्सची वाट पाहात आहेत. महागाईच्या ताज्या आकडेवारीनंतर डिसेंबरच्या आढाव्यात रिझर्व्ह बँक कर्जदरात आणखी वाढ करेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. असे झाल्यास डिसेंबरपासून कर्जावर घर किंवा कार घेणे अधिक महाग होणार हे निश्चित. म्हणजेच, जर तुमची खरेदी करायची योजना असेल, तर वाट पाहणं तुम्हाला महागात पडू शकतं.

व्याज दर किती वाढू शकतो
एचएसबीसीने डिसेंबरच्या आढाव्यात आरबीआयच्या दरांमध्ये अर्धा टक्का वाढ करणे शक्य असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे मुख्य दर ६.४ टक्के वाढतील. एचएसबीसीच्या म्हणण्यानुसार महागाई वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेवर दबाव वाढला आहे, त्यामुळे मध्यवर्ती बँक दर वाढवणार आहे. याआधी सप्टेंबरच्या अखेरीस रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्धा टक्का वाढ केली होती. रिझव्‍‌र्ह बँकेने डिसेंबरमध्येही अर्ध्या टक्‍क्‍यांनी व्याजदर वाढवले तर वर्षअखेरीस कर्जाचे दरही वाढतील, म्हणजेच आगामी काळात कर्ज अधिक महाग होईल. 

सलग ९ व्या महिन्यात महागाईचा दर नियंत्रणाबाहेर
खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाई 7.4 टक्क्यांच्या पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. सलग ९ व्या महिन्यात किरकोळ महागाई दोन ते सहा टक्क्यांच्या आरबीआयच्या समाधानकारक पातळीच्या वर राहिली आहे. आरबीआय याच आकडेवारीच्या आधारे आपलं पतधोरण ठरवत असते. अधिकृत आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये 7.41 टक्क्यांवर पोहोचली. ऑगस्टमध्ये 7 टक्के आणि सप्टेंबर 2021 मध्ये 4.35 टक्के इतका दर होता. ऑगस्टमधील 7.62 टक्क्यांवरून या वर्षी सप्टेंबरमध्ये खाद्यपदार्थांची महागाई थेट 8.60 टक्क्यांवर पोहोचली आहे.

Web Title: rbi may raise repo rate by 50 bps on higher inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.