RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेकडून नव्या वित्तीय वर्षातील पहिलं पतधोरण आज (बुधवार) जाहीर करण्यात आलं. यापूर्वी कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन धोरणात्मक व्याजदर कायम ठेवले जाऊ शकतात, असं एका सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, २०२२ च्या पहिल्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याज दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. याशिवाय रेपो दरही ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे रिव्हर्स रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नसून तेदेखील ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले होते.
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातदेखील व्याज दरात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याची घोषणा शक्तिकांत दास यांनी केली होती. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या सावटादरम्यान रिझर्व्ह बँक व्याजदरात कोणतेही बदल करणार नाही अशी शक्यता काही जाणकारांनी व्यक्त केली होती.
The recent surge in COVID19 cases adds uncertainty to the domestic growth outlook amid tightening of restrictions by some state governments: RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/UYhr3ESieH
— ANI (@ANI) April 7, 2021
RBI keeps repo rate unchanged at 4%, maintains accommodative stance; Reverse repo rate stands at 3.35% pic.twitter.com/Nm9Lbxd8DH
— ANI (@ANI) April 7, 2021
The projection of real GDP growth for 2021-22 is retained at 10.5%: RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/P7dYek5xfe
— ANI (@ANI) April 7, 2021
जीडीपी वाढ १०.५ टक्के राहण्याचा अंदाज
"रेपो दर ४ टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्क्यांवर कायम राहणार आहे. जोपर्यंत वाढ स्थिर होत नाही तोपर्यंत पॉलिसी रेट अकोमडेटिव्हच राहतील," असं दास यावेळी म्हणाले. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढ १०.५ टक्के राहिल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. याशिवाय सर्व भारतीय वित्तीय संस्थांना ५० हजार कोटी रूपयांचं कर्ज दिलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.