रिझर्व्ह बँकेच्या (Resrve Bank Of india) द्विमासिक पतधोरण आढावा समितीच्या तीन दिवसीय बैठकीची सांगता झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत व्याजदर जैसे थे ठेवण्यावर निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान दास यांनी सलग आठव्यांदा व्याज दरात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याची माहिती दिली.
रिझर्व्ह बँकेनं सलग आठव्यांदा व्याज दरात कोणतेही बदल केलेले नाही. रेपो दर ४ टक्क्यांवर आणि रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. यामुळे सामान्यांच्या ईएमआय (EMI) मध्ये तुर्तास कोणताही बदल होणार नाही.