रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची मंगळवारपासून बैठक सुरू झाली होती. या बैठकीतील अपडेट आता समोर आले आहेत. आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. तसेच आता नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी खुशखबर दिली आहे. आरबीआयने रेपो रेट ६.५% एवढा ठेवला आहे. यामुळे आता कर्ज घेणाऱ्यांसाठी दिलासा मिळेल. यासह आरबीआय गव्हर्नरने फ्लोटिंग रेट लोनबाबतही घोषणा केली. गव्हर्नर यांनी सांगितले की, आरबीआय लवकरच फ्लोटिंग रेट कर्ज रीसेट करण्यासाठी नवीन नियम आणेल.
फ्लोटिंग रेट लोन हे रेपो रेट किंवा बाजार व्याज दराचा परिणाम होतो. जेव्हा RBI रेपो दर वाढवते तेव्हा फ्लोटिंग रेट कर्जाचा व्याजदर देखील वाढतो आणि जेव्हा RBI रेपो दर कमी करते तेव्हा कर्जाचा व्याजदर देखील कमी होतो. म्हणजेच, फ्लोटिंग रेट लोनवर आरबीआयचा रेपो दर वाढवण्याचा आणि कमी करण्याचा थेट परिणाम होतो आणि त्याचा फरक सामान्यांच्या खिशावर पडतो.
RBI चा मोठा निर्णय; 500 रुपयांपर्यंतच्या UPI पेमेंटसाठी 'पिन' आवश्यक नाही
फिक्स्ड रेट लोनमध्ये, कर्ज घेताना व्याजाचा दर निश्चित केला जातो. त्यानुसार तुमचा ईएमआय निश्चित केला जातो. अशा परिस्थितीत, कर्जदाराला माहित असते की संपूर्ण कर्जाच्या कालावधीसाठी त्याला दरमहा किती EMI भरावे लागेल. रेपो दरात वाढ किंवा घट झाल्याने त्याचा परिणाम होत नाही.
फ्लोटिंग रेट होम लोनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रीपेमेंट दंड लागू होत नाही. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला या दरम्यान कर्जाची मोठी रक्कम परत करून कर्जाचा बोजा कमी करायचा असेल, तर त्यासाठी त्याच्याकडून कोणताही दंड घेतला जात नाही. तर फिक्स्ड रेट लोनमध्ये, प्रीपेमेंटसाठी दंड भरावा लागतो. याशिवाय, जर तुम्ही निश्चित दराचे कर्ज घेतले आणि नंतर व्याजदर कमी झाले, तर तुम्हाला त्याचा कोणताही लाभ मिळत नाही.
बैठकीतील महत्वाचे मुद्दे
आरबीआयने रेपो दर 6.5% वर स्थिर ठेवला आहे.
Q2 साठी चलनवाढीचा अंदाज 5.2% वरून 6.2% वर वाढवला.
रोख रक्कम कमी करण्यासाठी RBI चे मोठे पाऊल, NDTL मध्ये बँकांना 10% ICRR ठेवावा लागेल.
FY24 GDP वाढीचा अंदाज 6.5% वर, FY25 GDP 6.6% वर राखून ठेवला.
महागाईमुळे जुलै-ऑगस्टमध्येही महागाई वाढणार आहे.
FY24 साठी CPI महागाईचा अंदाज 5.4% आहे.
एमपीसीने एकमताने दर स्थिर ठेवण्याच्या बाजूने मत दिले.
परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची तयारी आहे.
एमपीसीच्या 6 पैकी 5 सदस्य अनुकूल भूमिका मागे घेण्याच्या बाजूने आहेत.