रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली. यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात कोणतेही बदल झाले नसल्याची माहिती दिली. यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला असून ईएमआयमध्येही तुर्तास कोणतीही वाढ होणार नाही. रिझर्व्ह बँकेनं रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवले आहे. तर दुसरीकडे क्रेडिट ग्रोथ आणि बँकिंग सिस्टमदेखील उत्तम स्थितीत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
पतधोरण समितीच्या सहा पैकी पाच सदस्यांनी रेपो दर कायम ठेवण्याच्या बाजूनं मत दिलं. महागाईदेखील कमी होत असल्याचं आम्हाला दिसत आहे. गेल्या वर्षी महागाईचा दर ६ टक्क्यांपेक्षा अधिक होता. आता कमी झाला असल्याची माहिती दास यांनी दिली.
MPC (Monetary Policy Committee) decided to keep the policy repo rate unchanged at 6.5%: RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/Se8GDvCvPy
— ANI (@ANI) June 8, 2023
... म्हणून निर्णय
"भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आणि लवचिक आहे ही दिलासादायक बाब आहे. ग्लोबल पॉलिसी सामान्य झालेली नाही हे आपण जाणतोच, परंतु देशांतर्गत मायक्रोइकॉनॉमिक फंडामेंटल्स अधिक मजबूत होत आहेत याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. यामुळे पॉलिसी पॅनेलने सर्वानुमते व्याजदरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे," असं शक्तिकांत दास म्हणाले.
याशिवाय चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर आठ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.५ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ६ टक्के आणि चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ५.७ टक्के राहण्याची अपेक्षा रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे वाढत्या महागाईवर बारीक लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं मतही दास यांनी व्यक्त केलं.
Consequently, the Standing Deposit Facility (SDF rate) remains at 6.25% and the marginal standing facility and the bank rates stand at 6.75%: RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/3y89RxORqI— ANI (@ANI) June 8, 2023
अखेरची वाढ फेब्रुवारीत
रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी महिन्यात रेपो दरात शेवटची वाढ केली होती. त्यावेळी रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली होती. मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत रेपो दरात तब्बल २.५० टक्क्यांची वाढ झाली आहे. अलीकडच्या काळात जीडीपीची आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली दिसत आहे.