Join us

अशी आहे, 100 रुपयांची नवी नोट; RBI कडून फोटो प्रसिद्ध 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 5:15 PM

भारतीय चलनात लवकरच 100 रुपयांची नवी नोट येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नव्या 100 रुपयांच्या नोटेचा फोटो जारी करण्यात आला असून नोटेचा रंग हलकासा जांभळा आहे. या नोटेमध्ये गुजरातच्या ऐतिहासिक राणीच्या विहिरीचा (बावडी) फोटो देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : भारतीय चलनात लवकरच 100 रुपयांची नवी नोट येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नव्या 100 रुपयांच्या नोटेचा फोटो जारी करण्यात आला असून नोटेचा रंग हलकासा जांभळा आहे. या नोटेमध्ये गुजरातच्या ऐतिहासिक राणीच्या विहिरीचा (बावडी) फोटो देण्यात आला आहे.

देवास येथील मुद्रण छपाई केंद्रात 100 रुपयांच्या नोटांची छपाई सुरु झाली आहे. म्हैसूर येथील ज्या प्रिटींग प्रेसमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटेचे डिजाईन बनविण्यात आले होते. त्याच, प्रिंटिंग प्रेसमध्ये या 100 रुपयांच्या नोटेचे डिजाईन बनविण्यात आले आहे. तसेच, 100 रुपयांच्या या नव्या नोटेमध्ये मायक्रो सेक्युरिटी फिचर्स असणार आहेत. या नोटेचा आकार जुन्या 100 रुपयांच्या नोटेपेक्षा कमी असून साइज 66 मिमी × 142 मिमी असणार आहे.

विशेष म्हणजे, या 100 रुपयांच्या नोटांसाठी वापरण्यात आलेला कागद आणि शाई ही स्वदेशी आहे.  साधारणत: ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात या नोटा चलनात येतील, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकभारत