Lokmat Money > बिझनेस न्यूज > एकीकडे रिझर्व्ह बँकेचा तुर्तास दिलासा, तर दुसरीकडे ‘या’ सरकारी बँकेचे व्याजदर वाढले, EMI वाढणार

एकीकडे रिझर्व्ह बँकेचा तुर्तास दिलासा, तर दुसरीकडे ‘या’ सरकारी बँकेचे व्याजदर वाढले, EMI वाढणार

या सरकारी बँकेनं १२ एप्रिलपासून आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट म्हणजे एमएलसीआरमध्ये वाढ केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 03:59 PM2023-04-12T15:59:25+5:302023-04-12T16:00:32+5:30

या सरकारी बँकेनं १२ एप्रिलपासून आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट म्हणजे एमएलसीआरमध्ये वाढ केली आहे.

rbi not increased repo rate government canara bank increased interest rates EMI will increase know details | एकीकडे रिझर्व्ह बँकेचा तुर्तास दिलासा, तर दुसरीकडे ‘या’ सरकारी बँकेचे व्याजदर वाढले, EMI वाढणार

एकीकडे रिझर्व्ह बँकेचा तुर्तास दिलासा, तर दुसरीकडे ‘या’ सरकारी बँकेचे व्याजदर वाढले, EMI वाढणार

नुकतीच रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक पार पडली. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात कोणताही बदल न केल्याची माहिती दिली. परंतु यानंतर आता सरकारी असलेल्या कॅनरा बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. बँकेनं MCLR मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे तुमची कार, घर आणि वैयक्तिक कर्जाचा EMI वाढेल. कॅनरा बँकेने १२ एप्रिल २०२३ पासून म्हणजेच एमएलसीआरमध्ये वाढ केली आहे. 

HDFC Bank नं स्वस्त केले व्याजरदर, कमी होणार EMI; पाहा कोणाला होणार फायदा?

कॅनरा बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेनं सहा महिनं आणि एक वर्षाच्या कालावधीसाठी एमएलसीआरमध्ये वाढ केली आहे. बँकेनं ५ बेसिस पॉइंट्सनं यात वाढ केलीये. सहा महिने आणि एक वर्ष कालावधीसाठी एमएलसीआर अनुक्रमे ८.४५ टक्के आणि ८.६५ टक्के करण्यात आलाय. इतर कालावधीसाठी एमएलसीआर दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

ग्राहकांना झटका
कॅनरा बँकेच्या या निर्णयानंतर ग्राहकांचं होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनचे ईएमआय वाढणार आहेत. बेस रेट असे किमान दर आहेत ज्यावर बँका कर्ज देऊ शकतात. यापेक्षा कमी दरानं बँकांना कर्ज देता येत नाही.

एचडीएफसीनं कमी केला व्याजदर
खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्या HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकनं काही निवडक कालावधीच्या कर्जासाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (MCLR) मध्ये ८५ बेस पॉईंट्स पर्यंत कपात केली आहे. नवे दर १० एप्रिलपासून लागू झाले आहेत. 

Web Title: rbi not increased repo rate government canara bank increased interest rates EMI will increase know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.