Join us

RBI Policy Rate: RBI च्या पतधोरण समितीच्या बैठकीला सुरूवात, ग्राहकांच्या खिशावर पुन्हा ताण वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 11:38 AM

पुन्हा रेपो रेट वाढणार का? ईएमआयचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीची (MPC) तीन दिवसीय द्विमासिक बैठक आजपासून (३ ऑगस्ट) सुरू झाली आहे. या बैठकीतील निर्णयांची माहिती (RBI Meeting Updates) रिझर्व्ह बँक 5 ऑगस्ट रोजी मांडणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून पुन्हा रेपो दरात (Repo Rates) वाढ होणार की रेपो दर जैसे थे राहणार, हे या बैठकीतून स्पष्ट होणार आहे. चलनवाढीचा सध्याचा स्तर जगभरातील मध्यवर्ती बँकांवर व्याजदर वाढवण्यासाठी दबाव आणत असल्याचंही दिसून येत आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्स आणि त्यानंतर जूनमध्ये ५० बेसिस पॉईंटची अशी एकूण ९० बेसिस पॉईंट्सची वाढ केली होती. त्याच वेळी, यूएस फेडरल रिझर्व्हने महागाईचा सामना करण्यासाठी २२५ बेसिस पॉईंटने आपले दर वाढवले​​. त्या तुलनेत भारतीय रिझर्व्ह बँकेनं ९० बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे.

काय म्हणतात तज्ज्ञ?५ ऑगस्ट रोजी पतधोरण समिती रेपो दरात ०.३५ टक्क्यांची वाढ करेल. सोबतच हळूहळू रिझर्व्ह बँक आपली भूमिका कठोरही करेल असं बोफा ग्लोबल रिसर्चच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तर दुसरीकडे बँक ऑफ बडोदाच्या एका रिपोर्टमध्ये फेडरल रिझर्व्हनं व्याज दरात २.२५ टक्क्यांची वाढ केली आहे, अशातच रिझर्व्ह बँकही ठरलेल्या वेळेच्या पूर्वीच रेपो दरात वाढ करू शकते असं म्हटलं आहे. परंतु भारतातील सध्याची परिस्थिती पाहता कठोर भूमिका घेण्याचीही गरज नसल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दास