नवी दिल्ली : हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झालेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या प्रकरणात तपासणी अहवालाच्या प्रती देण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे. यासाठी बँकेने माहितीच्या अधिकारातील (आरटीआय) नियमांचा हवाला दिला आहे. या नियमांनुसार, तपास प्रक्रियेला प्रभावित करणारी माहिती देण्यास प्रतिबंध आहेत, तसेच दोषींवर कारवाईस यामुळे परिणाम होऊ शकतो.
रिझर्व्ह बँकेने याबाबत आरटीआय अर्जाच्या उत्तरात म्हटले आहे की, आमच्याकडे अशा प्रकारची कोणतीही माहिती नाही की, पीएनबीमध्ये १३ हजार कोटींचा घोटाळा कसा समोर आला? हा अर्ज आता पीएनबीकडे पाठविण्यात आला आहे. देशातील इतिहासातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा
याच वर्षी समोर आला आहे.
हिरे व्यापारी नीरव मोदी आणि
त्याचे मामा गीतांजली जेम्सचे प्रवर्तक मेहुल चोकसी या घोटाळ्याचे सूत्रधार आहेत.
पीनएनबीचा तपासणी अहवाल देण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार
हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झालेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या प्रकरणात तपासणी अहवालाच्या प्रती देण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 02:36 AM2018-05-14T02:36:09+5:302018-05-14T02:36:09+5:30