अॅमेझॉन, झोमॅटो, नेटफ्लिक्स, फ्लिपकार्ट, मायक्रोसॉफ्टसारख्या ऑनलाईन मर्चंट्सना ग्राहकांचा क्रेडिट कार्ड डेटा स्टोअर करता येणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेनं जुलै २०२१ पासूल लागू होणाऱ्या नव्या अॅग्रिमेंट अँड पेमेंट गेटवे नियमांअंतर्गत ग्राहकांच्या क्रेडिट कार्डाची माहिती स्टोअर करण्याची मागणी फेटाळली. या सर्व मर्चंट्सनं नियमाक मंडळासह बैठकीची मागणी केली होती, तसंच त्यांना योग्य प्रतिनिधीत्व देण्यात आलं नसल्याचं म्हटलं. ही मागणी रिझर्व्ह बँकेनं फेटाळली.
जर मर्चंट्सनं ग्राहकांच्या क्रेडिट कार्डचा डेटा स्टोअर केला तर त्यांच्यासाठी सायबर सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो. या प्रकरणाशी त्यांचं काहीही घेणंदेणं नाही कारण हा नियम पेमेंट अॅग्रीगेटर्स आणि गेटवेशी संबंधित असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. लेव्हल १ चे मर्चंट्स २५ कोटी ग्राहकांसोबत ट्रान्झॅक्शन्स करतात. या मर्चंट्सनं १ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेला एक पत्र लिहिलं होतं. तसंच मर्चंट्सना कार्डचा डेटा स्टोअर करू न देण्यामुळे संपूर्ण प्रणाली बाधित होणार असल्याचं म्हटलं होतं. मर्चंट्स आपल्या बँक आणि पेमेंट अॅग्रीगेटर्सचं प्रतिनिधीत्व करत होते आणि व्हिसा, मास्टरकार्डसारखे नेटवर्क ऑपरेटर्सनेदेखील ग्राहकांचा डेटा स्टोअर करण्याचं समर्थन केलं.
डेटा स्टोअर करता येणार नाही
रिझर्व्ह बँकेनं नव्या मार्गदर्शक सूचनांअंतर्गत मर्चंट्सना आपल्या सर्व्हरवर ग्राहकांची कार्ज आणि त्यांचा डेटा स्टोअर करू शकत नसल्याचं म्हटलं. याच मार्गदर्शक सूचनांअंतर्गत पेमेंट अॅग्रीगेटर्सही ज्या ठिकाणी मर्चंट्सची पोहोच आहे अशा ठिकाणी डेटा स्टोअर करू शकत नसल्याचं म्हटलं आहे. जाणकारांच्या मते डेटा स्टोअर करू दिल्यास ग्राहकांच्या समस्या वाढतील आणि पेमेंट इकोसिस्टमही बाधित होणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
सिस्टम ठप्प झाल्यानं समस्या
इकॉनॉमिक टाईम्सच्या एका वृत्तानुसार ब्लॅक डॉट पब्लिक पॉलिसी अॅडव्हायझर्सचे सस्थापक मंदार कागडे यांनी सांगितल्याप्रमाणे मर्चंट आणि पीएला ग्राहकांच्या ट्रान्झॅक्सन्ससाठी प्रत्येक वेली ऑथेंटिकेसनसाटी बँकेच्या एपीआयला कॉल करावा लागेल. यामुळे सिस्टम ठप्प झाल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. सबस्क्रिप्शनवाल्या सेवांमध्येही समस्या निर्माण होऊ शकतात, असंही त्यांनी नमूद केलं.
मार्गर्शक सूचना स्पष्ट करण्याची गरज
"या मार्गदर्शक सूचना अधिक स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. विशेषत: या प्रकरणात काय पीजी आणि पीए मानले जाती, तसंच त्यांना डेटा स्टोअर करण्याची परवानगी असेल का? भारतात केवल दोन प्योर प्ले पेमेंट गेटवे आहेत. त्यांचं संचालन व्हिसा आणि मास्टरकार्ड करतात. हा नियम अन्य अशा पेमेंट गेटवे बिझनेसवर कसा लागू होतो हे पाहावं लागेल, जे अॅग्रीगेटर्सच्या रूपात काम करतात," अशी प्रतिक्रिया एक पेमेंट प्लॅटफॉर्म मिंटओकचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमन खंडुजा यांनी दिली.
ऑनलाईन मर्चंट्सना Credit Card डेटा स्टोअर करता येणार नाही, RBI नं मागणी फेटाळली
अॅमेझॉन, झोमॅटो, नेटफ्लिक्स, फ्लिपकार्ट, मायक्रोसॉफ्टनं केली होती मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 01:54 PM2021-02-26T13:54:36+5:302021-02-26T13:57:15+5:30
अॅमेझॉन, झोमॅटो, नेटफ्लिक्स, फ्लिपकार्ट, मायक्रोसॉफ्टनं केली होती मागणी
Highlightsअॅमेझॉन, झोमॅटो, नेटफ्लिक्स, फ्लिपकार्ट, मायक्रोसॉफ्टनं केली होती मागणीक्रेडिट कार्ड डेटा स्टोअर केलास ग्राहकांच्या सायबर सुरक्षेची जाणकारांना भीती