Join us  

देशातील लोकांनी दडवले 8897 कोटी; 2000 रुपयांच्या 'एवढ्या' नोटा अजूनही बाजारात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 8:57 PM

RBI Report: RBI ने दिलेल्या माहितीनुसार, हजारो कोटींच्या 2000 रुपयांच्या नोटा मार्केटमध्येच आहेत.

RBI Report: नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नोटाबंदीनंतर 2 हजार रुपयांची नोट सुरू झाली होती. पण, 19 मे 2023 रोजी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली. लोकांना आपापल्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. आता सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण नोटा अद्याप सिस्टममध्ये परतल्या नाहीत. 31 जानेवारी 2024 पर्यंत 2000 रुपयांच्या केवळ 97.5 टक्के नोटा परत आल्या आहेत. म्हणजेच, अद्याप 8897 कोटी रुपयांच्या नोटा बाजारातच आहेत. 

RBI च्या म्हणण्यानुसार 2000 रुपयांच्या नोटांच्या चलनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे 9 फेब्रुवारीपर्यंत चलन परिसंचरण 3.7 टक्क्यांनी घटले आहे. हे एका वर्षापूर्वीच्या 8.2 टक्क्यांपेक्षा खूपच कमी आहे. करन्सी इन सर्कुलेशनद्वारे चलनात असलेल्या नोटा आणि नाण्यांची माहिती मिळते. यामध्ये जनतेकडे उपलब्ध असलेली रोकड आणि बँकांमध्ये पडून असलेल्या पैशांचाही समावेश आहे.

आरबीआयने म्हटले की, 2000 रुपयांची नोट काढून टाकल्याने चलनाची गरज कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. जानेवारी महिन्यात बँकांच्या ठेवींमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. हे 2000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याशी जोडून पाहिले जाऊ शकते. रिझर्व्ह मनीही एका वर्षापूर्वीच्या 11.2 टक्क्यांवरून 9 फेब्रुवारीपर्यंत 5.8 टक्क्यांवर घसरली आहे.

दरम्यान, सेंट्रल बँकेने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. 19 मे पर्यंत अंदाजे 3.56 लाख कोटी रुपयांच्या 2,000 रुपयांच्या नोटा चलनात होत्या. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ही नोट बदलणे किंवा जमा करण्याचा पर्याय देण्यात आला होता. नंतर ही मुदत 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली. नोटाबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांना पर्याय म्हणून हे चलन सुरू करण्यात आले होते.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकपैसानिश्चलनीकरणव्यवसाय