Reserve Bank of India : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) महाराष्ट्रातील अहमदनगर येथील नगर अर्बन को-ठप बँक लिमिटेडवर (Nagar Urban Co-operative Bank Ltd) निर्बंध घातले आहेत. या अतर्गत ग्राहकांना आता त्यांच्या खात्यातून केवळ १० हजार रुपयेच काढता येतील. त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्यावर निर्बंध असतील. बँकेच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.
बँकिंग नियमन अधिनियम १९४९ अंतर्गत ६ डिसेंबर २०२१ पासून पुढील सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू असतील. तसंच याची समीक्षाही केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय ना कोणाला कर्ज देता येईल किंवा अॅडव्हान्स देता येईल, याशिवाय कोणत्याही कर्जाचं नुतनीकरणही करता येणार नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक, देवाणघेवाण, संपत्तीचं हस्तांतरण किंवा विक्रीदेखील करता येणार नसल्याचं आरबीआयनं म्हटलं.
१० हजारच काढता येणार
रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार आता खातेधारकांनाही रक्कम काढण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. खातेधारकांना आपल्या खात्यातून केवळ १० हजार रुपयांची रक्कमच काढता येणार आहेत. ग्राहकांना माहिती मिळावी यासाठी बँकेच्या परिसरात रिझर्व्ह बँकेच्या आदेशाच्या प्रतीही लावण्यात आल्यात. शिवाय या निर्बंधांचा अर्थ बँकेचा लायसन्स रद्द करणं असा होत नाही असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय.
महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर RBI कडून निर्बंध; १० हजारांपर्यंतच रक्कम काढता येणार
Reserve Bank of India नं महाराष्ट्रातील अहमदनगर येथील एका सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 09:14 AM2021-12-07T09:14:06+5:302021-12-07T09:14:35+5:30