Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँक FD पेक्षा अधिक रिटर्न देतायत RBI सेव्हिंग बाँड्स, गुंतवणूकदारांना नफा कमावण्याची संधी

बँक FD पेक्षा अधिक रिटर्न देतायत RBI सेव्हिंग बाँड्स, गुंतवणूकदारांना नफा कमावण्याची संधी

गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा आणि अधिक नफा मिळवायचा असेल, तर कुठे गुंतवणूक करणं योग्य ठरेल? असा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराला पडलेला असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 01:24 PM2023-07-14T13:24:04+5:302023-07-14T13:24:22+5:30

गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा आणि अधिक नफा मिळवायचा असेल, तर कुठे गुंतवणूक करणं योग्य ठरेल? असा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराला पडलेला असतो.

RBI Savings Bonds offer higher returns than bank FDs an opportunity for investors to make profits know details | बँक FD पेक्षा अधिक रिटर्न देतायत RBI सेव्हिंग बाँड्स, गुंतवणूकदारांना नफा कमावण्याची संधी

बँक FD पेक्षा अधिक रिटर्न देतायत RBI सेव्हिंग बाँड्स, गुंतवणूकदारांना नफा कमावण्याची संधी

RBI Savings Bond vs Bank FD Interest Rates : तुम्हाला गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा आणि अधिक नफा मिळवायचा असेल, तर कुठे गुंतवणूक करणं योग्य ठरेल? हा एक प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर प्रत्येक गुंतवणूकदाराला जाणून घ्यायचं असतं. दरम्यान, रिझर्व्ह बँक फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँडवर मिळणाऱ्या व्याजदरानं गुंतवणूकदारांना आकर्षित केलं आहे. हे व्याजदर बँक एफडीवर उपलब्ध असलेल्या व्याजदरापेक्षा जास्त आहे. यासोबतच अल्प बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षाही ते अधिक आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँकेच्या सेव्हिंग बाँड्समध्ये गुंतवणूक करून अधिक परतावा मिळविण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

RBI बाँडवर किती आहे व्याजदर?

रिझर्व्ह बँकेनं जुलै महिन्यात घेतलेल्या आढाव्यादरम्यान फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड्सवरील व्याजदर 7.35 टक्क्यांवरून 8.05 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. रिझर्व्ह बँक सेव्हिंग बाँड्सचे व्याजदर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटशी (NSC) जोडलेले आहेत. त्यामुळे एनएससीच्या व्याजदरातील कोणताही बदल रिझर्व्ह बँक सेव्हिंग बाँड्सवर देऊ केलेल्या व्याजदरामध्ये दिसून येतो. हे व्याजदर एनएससी वरील व्याजदरापेक्षा 0.35 टक्क्यांनी जास्त आहे.

बँक FD वर किती व्याज?

जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट गुंतवणुकीवर उपलब्ध व्याजदर पाहिला तर तो रिझर्व्ह बँकेच्या बाँडच्या तुलनेत कमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया सामान्य नागरिकांना एफडीवर 6.5 टक्के व्याज देते. एचडीएफसी बँक आयसीआयसीआय बँक 7-7 टक्के व्याजदर देतात. हा व्याजदर 5 वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहे.

स्मॉल सेव्हिंग स्कीमवर किती व्याज?

केंद्र सरकार सप्टेंबर तिमाहीसाठी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर 7.7 टक्के व्याज दर देत आहे. 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस मंथली स्कीम अकाऊंटवर (MIS) सप्टेंबर तिमाहीसाठी 7.4 टक्के व्याजदर दिला जात आहे.

फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँडचे फायदे

  • भारतातील रहिवासी व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF) रिझर्व्ह बँकेच्या फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतात.
  • या बाँडमधील किमान गुंतवणुकीची मर्यादा 1,000 रुपयांपासून सुरू होते. परंतु कमाल गुंतवणूकीवर मर्यादा नाही.
  • रिझर्व्ह बँकेच्या फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉण्ड्समधील गुंतवणुकीचा कालावधी 7 वर्षांचा आहे. 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वैयक्तिक गुंतवणूकदारांना मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी आहे.
  • आरबीआय बाँड्स मॅच्युरिटी टेन्योरवर व्याज देण्याची ऑफर देत नाहीत. बाँड्सची व्याजाची रक्कम दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी सहा महिन्याच्या कालावधीनं दिली जाते.
  • RBI च्या फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड्सवर व्याजदर दर सहा महिन्यांनी म्हणजे दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी रीसेट केला जातो.

Web Title: RBI Savings Bonds offer higher returns than bank FDs an opportunity for investors to make profits know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.