Loan Pre-Payment Charges : चनल धोरण बैठकीचे निर्णय जाहीर करताना आरबीआय रेपो दर कमी करतील अशी आशा कर्जदारांना होती. आरबीआयने 'रेपो दर जैसे थे' ठेवल्याने ग्राहकांची निराशा झाली आहे. कर्जाचे हप्ते जरी कमी झाले नसले आरबीआयने घेतलेल्या एका निर्णयाने कर्जदारांना ऐन सणासुदीत मोठा दिलासा दिला आहे. कर्ज ग्राहकांचे हित लक्षात घेऊन फ्लोटिंग रेट मुदत कर्ज बंद करण्यासाठी फोरक्लोजर चार्जेस (foreclosure Charges) किंवा प्री-पेमेंट दंड (Pre-Payment Penalties) रद्द करण्यात आला आहे.
बँका आणि एनबीएफसीद्वारे फोरक्लोजर चार्जेस आकारण्यावर बंदी आरबीआयच्या पतधोरण बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांत रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. या अंतर्गत, बँक किंवा एनबीएफसीला व्यवसायाव्यतिरिक्त वैयक्तिक श्रेणी अंतर्गत फ्लोटिंग रेट मुदत कर्ज घेणाऱ्या कर्जदारांकडून कर्ज बंद करण्यासाठी फोरक्लोजर चार्जेस किंवा प्री-पेमेंट दंड वसूल करता येणार नाही. या निर्णयामुळे कर्जदारांना मोठा फायदा होणार आहे.
सूक्ष्म आणि लघु उद्योगांना दिलासाआरबीआय गव्हर्नर म्हणाले की, आता या गाइडलाइन्सचा आणखी विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सूक्ष्म आणि लघु उद्योगांना दिलेल्या कर्जावरही ही मार्गदर्शक तत्त्वे प्रभावी होतील. याचा अर्थ सूक्ष्म आणि लघु उद्योगांना दिलेल्या फ्लोटिंग रेट मुदत कर्जावर देखील, बँका आणि NBFC येत्या काही दिवसांत फोरक्लोजर चार्जेस किंवा प्री-पेमेंट दंड आकारू शकणार नाहीत. या निर्णयावर लवकरच सल्लामसलत करण्यासाठी मसुदा परिपत्रक जारी केले जाईल.
फ्लोटिंग रेट कर्ज म्हणजे काय?बँक कर्जाचे व्याजदर २ प्रकारे ठरवतात. एक फ्लोटिंग रेट लोन आणि दुसरे फिक्स रेट लोन. फ्लोटिंग रेट कर्ज बेंचमार्क दरावर आधारित आहे. उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा आरबीआय रेपो दर बदलते, तेव्हा बँका फ्लोटिंग रेट कर्जावरील व्याजदर देखील कमी जास्त करतात. म्हणजे जर आरबीआयने कपात केली तर बँका कर्जावरील व्याजदर कमी करतात. परंतु, स्थिर दराच्या कर्जावरील व्याजदर स्थिर आहेत. कर्ज घेताना निश्चित केलेले व्याजदर कर्जाची मुदत संपेपर्यंत सारखेच राहतात.
बँका किंवा एनबीएफसी फ्लोटिंग रेटवर गृहकर्ज देतात. तर सुवर्ण कर्ज, कार कर्ज आणि शैक्षणिक कर्जावरील व्याजदर निश्चित आहेत. आता आरबीआयच्या निर्णयानुसार बँका आणि एनबीएफसी सूक्ष्म आणि लघु उद्योगांना दिलेल्या फ्लोटिंग रेट मुदत कर्जाच्या मुदतपूर्व समाप्तीसाठी फोरक्लोजर शुल्क किंवा प्री-पेमेंट दंड आकारू शकणार नाहीत.