Join us

SBIकडून नियमांचे उल्लंघन, RBIने ठोठावला 7 कोटी रुपयांचा दंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 10:53 AM

एसबीआयने आयआरएसी नियमांचे पालन केले नाही

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया(एसबीआय) या देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने मोठा झटका दिला आहे. आरबीआयने एसबीआयवर 7 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. एनपीए (नॉन-परफॉर्मिंग अॅसेट) आणि इतर तरतुदीसंबंधी नियमांचे पालन एसबीआयकडून करण्यात आले नाही, म्हणून आरबीआयने हा दंड ठोठावला आहे. याशिवाय, युनियन बँक ऑफ इंडियाला सुद्धा 10 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

एसबीआयने आयआरएसी नियमांचे पालन केले नाही. तसेच, बँकेने चालू खाते उघडण्यासाठी आणि ऑपरेटिंगसाठी आचारसंहितेचे उल्लंघन केले. याशिवाय, एसबीआयवर फसवणूक आणि यासंबंधी रिपोर्टिंगच्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. चौकशी अहवाल आणि अन्य गरजेची कागदपत्रे पाहिल्यानंतर आरबीआयकडून एसबीआयला नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर एसबीआयकडून मिळालेल्या उत्तरानंतर आरबीआयकडून दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. 

युनियन बँकेला 10 लाखांचा दंडसायबर सुरक्षा संबंधित निर्देशांचे पालन केले नसल्याच्या आरोपाखाली आरबीआयने यूनियन बँक ऑफ इंडियावर 10 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या नाटिसीत हा दंड 9 जुलै 2019 रोजी ठोठावण्यात आला. युनियन बँकेकडून SWIFT नियमांचे पालन करताना त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाभारतीय रिझर्व्ह बँकबँकव्यवसाय