Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकांमध्ये 48,000 कोटी रुपये बेवारस; दावेदार शोधण्यासाठी RBI मोहीम राबवणार!

बँकांमध्ये 48,000 कोटी रुपये बेवारस; दावेदार शोधण्यासाठी RBI मोहीम राबवणार!

RBI : या अनक्लेम्ड (Unclaimed) रकमेचे दावेदार शोधण्यासाठी आरबीआयने मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक त्या 8 राज्यांवर आपले लक्ष केंद्रित करेल, जिथे जास्तीत जास्त रक्कम जमा केली जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 02:43 PM2022-07-27T14:43:43+5:302022-07-27T14:44:09+5:30

RBI : या अनक्लेम्ड (Unclaimed) रकमेचे दावेदार शोधण्यासाठी आरबीआयने मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक त्या 8 राज्यांवर आपले लक्ष केंद्रित करेल, जिथे जास्तीत जास्त रक्कम जमा केली जाते.

RBI START THE SEARCH FOR THE UNCLAIMED 48 THOUSAND CRORE DEPOSITED IN THE BANKS  | बँकांमध्ये 48,000 कोटी रुपये बेवारस; दावेदार शोधण्यासाठी RBI मोहीम राबवणार!

बँकांमध्ये 48,000 कोटी रुपये बेवारस; दावेदार शोधण्यासाठी RBI मोहीम राबवणार!

नवी दिल्ली : भारतीय बँकांकडे दावा न केलेली रक्कम (Unclaimed Amount) सातत्याने वाढत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या वार्षिक अहवालानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात बँकांमधील दावा न केलेली रक्कम 48,262 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. मागील आर्थिक वर्षात ही रक्कम 39,264 कोटी रुपये होती. आता या अनक्लेम्ड (Unclaimed) रकमेचे दावेदार शोधण्यासाठी आरबीआयने मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक त्या 8 राज्यांवर आपले लक्ष केंद्रित करेल, जिथे जास्तीत जास्त रक्कम जमा केली जाते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, जर एखाद्या ग्राहकाने त्याच्या खात्यातून 10 वर्षांपर्यंत कोणताही व्यवहार केला नाही, तर त्या खात्यात जमा रक्कम अनक्लेम्ड (Unclaimed) होते. ज्या खात्यातून व्यवहार होत, नाहीत ते खाते निष्क्रिय होते. अनक्लेम्ड रक्कम बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव आणि रेकरिंग डिपॉझिट खात्यात असू शकते. अनक्लेम्ड रक्कम रिझर्व्ह बँकेच्या ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी (DEAF) मध्ये जमा केली जाते.

आठ राज्यात सर्वाधिक रक्कम
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, यातील बहुतांश रक्कम तामिळनाडू, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक, बिहार आणि तेलंगणा/आंध्र प्रदेशमधील बँकांमध्ये जमा आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितले की, बँकांनी अनेक जागरुकता मोहिमा राबवूनही, कालांतराने दावा न केलेली रक्कम सातत्याने वाढत आहे.

काय वाढतेय अनक्लेम्ड रक्कम?
अनेक खाती दीर्घकाळ निष्क्रिय पडून असल्याने अनक्लेम्ड रकमेत वाढ होत आहे. दरवर्षी अशा खात्यांतील पैसे DEAF कडे जातात. बँक खाते निष्क्रिय होण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की खातेदाराचा मृत्यू, कुटुंबातील सदस्यांना मृत व्यक्तीच्या खात्याबद्दल माहिती नसणे, चुकीचा पत्ता किंवा खात्यात नॉमिनी नोंदणीकृत नसणे.

बँकेच्या वेबसाइटवर मिळेल माहिती
जर अनक्लेम्ड खात्याची रक्कम ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता खात्यात गेली असेल, तर ती परत मिळवण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा लागेल. अनक्लेम्ड ठेवींची माहिती सहसा फक्त बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असते. खातेदाराच्या पॅनकार्ड, जन्मतारीख, नाव आणि पत्ता यावरून माहिती मिळू शकते की, खातेदाराच्या खात्यात अनक्लेम्ड रक्कम पडून आहे की नाही.

Web Title: RBI START THE SEARCH FOR THE UNCLAIMED 48 THOUSAND CRORE DEPOSITED IN THE BANKS 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.