Lokmat Money > बिझनेस न्यूज > "अर्थव्यवस्थेचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही," RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितला प्लॅन

"अर्थव्यवस्थेचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही," RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितला प्लॅन

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी अर्थव्यवस्थेबाबत मोठं वक्तव्य केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 11:38 AM2023-12-29T11:38:41+5:302023-12-29T11:39:49+5:30

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी अर्थव्यवस्थेबाबत मोठं वक्तव्य केलं.

rbi to act early to prevent any risk no damage to the economy indias fastest growth said RBI Governor Shaktikanta Das | "अर्थव्यवस्थेचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही," RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितला प्लॅन

"अर्थव्यवस्थेचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही," RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितला प्लॅन

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी अर्थव्यवस्थेबाबत मोठं वक्तव्य केलं. देशाच्या अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या कोणत्याही जोखमीचा सामना करण्यासाठी रिझर्व्ह बँक त्वरित आणि निर्णायक कारवाई करण्यास वचनबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं. वाढत्या विकासाच्या क्षमतेसह भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असल्याचंही दास यांनी नमूद केलं.

"रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच रिटेल लोनच्या काही सेगमेंटबाबत बँकांचा वाढता कल रोखण्यासाठी पावलं उचलली आहेत. जागतिक अर्थव्यवस्था अनेक आव्हानांना तोंड देत आहे. यापैकी, भारताची अर्थव्यवस्था मजबूत आर्थिक व्यवस्थेसह मॅक्रो-इकॉनॉमिक आघाडीवर ताकद दाखवत आहे. कोणत्याही प्रकारचा धोका वाढण्यापासून रोखण्यासाठी आम्ही सतर्क आणि तत्काळ तसंच निर्णायक कारवाई करण्यासाठी वचनबद्ध आहोत," असं दास म्हणाले.

"किरकोळ कर्जांच्या वाटपाप्रती बँकांचा वाढता कल कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं पावलं उचलली. अर्थव्यवस्थेच्या वास्तविक गरजांसाठी निधीच्या उपलब्धतेशी तडजोड न करता आर्थिक स्थैर्य राखण्याची त्याची वचनबद्धता यातून दिसून येते. वाढत्या क्षमतेसह भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे," असंही त्यांनी नमूद केलं. 

एनपीए नीचांकी पातळीवर
रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक स्थिरता अहवाल (FSR) २०२२-२३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सप्टेंबर २०२३ मध्ये बँकांचे नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NPA) रेश्यो ३.२ टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर आणि निव्वळ एनपीए प्रमाण ०.८ टक्क्यांवर राहिलं आहे. या कालावधीत, बँकांचा ग्रॉस नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (GNPA) रेश्यो देखील ३.२ टक्क्यांच्या अनेक वर्षांच्या नीचांकी पातळीवर आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपन्यांची स्थिती मजबूत झाली आहे, सप्टेंबर २०२३ पर्यंत ग्रॉस एनपीए ४.६ टक्के आणि मालमत्तेवर परतावा 2.9 टक्के राहिला आहे.

Web Title: rbi to act early to prevent any risk no damage to the economy indias fastest growth said RBI Governor Shaktikanta Das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.