Join us  

RBI Update : 'या' मोठ्या बँकांनी लॉकरचे नियम बदलले, आता भरावे लागणार एवढे शुल्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 7:25 PM

RBI ने देशातील सर्व बँकांना बँक लॉकरच्या सुधारित करारावर ग्राहकांना स्वाक्षरी करण्यासाठी मुदतही दिली.

काही दिवसापूर्वी आरबीआयने बँक लॉकरबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानंतर सरकारी ते खासगीपर्यंत अनेक बँकांनीही लॉकरचे शुल्क बदलले आहे. इतकेच नाही तर RBI ने देशातील सर्व बँकांना बँक लॉकरच्या सुधारित करारावर ग्राहकांना स्वाक्षरी करण्यासाठी मुदतही दिली आहे. यासोबतच ३० जूनपासून वाढीव शुल्काची अंमलबजावणी करण्याचे सांगण्यात आले आहे. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला बँक लॉकरशी संबंधित नियम माहित असणे खूप महत्वाचे आहे. प्रत्‍येक बँकेतील लॉकर चार्जेस त्‍याच्‍या आकारमानानुसार वेगवेगळ्या प्रकारे मोजले जातात.

सोन्याच्या किंमतीला झळाली, पण चांदी फिकी पडली; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर

SBI लॉकर चार्ज

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानेही लॉकरचे शुल्क बदलले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना 3 आकाराच्या लॉकरची सुविधा प्रदान करते. तिन्ही लॉकर्सचे शुल्क स्वतंत्रपणे ठरवण्यात आले आहे. SBI च्या मते, बँक त्याच्या शहरात राहणाऱ्या ग्राहकाकडून GST सह 2000 चार्ज करते. तसेच, ग्रामीण आणि निमशहरी भागात राहणाऱ्या ग्राहकांना बँक 1500 सह जीएसटी भरावा लागेल.

HDFC लॉकर शुल्क

HDFC ही खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. लॉकरचे चार्जेस ही बँक 1350 रुपये ते 20 हजार रुपये लॉकर चार्ज करते. बँक मध्यम आकाराच्या बँक लॉकरसाठी रुपये 3000 आणि महानगरांमध्ये मोठ्या लॉकरसाठी 7000 रुपये आकारते. दुसरीकडे, एखाद्या ग्राहकाला अतिरिक्त मोठे लॉकर हवे असल्यास 15 ते 20 हजार रुपये वार्षिक शुल्क द्यावे लागते.

ICICI लॉकर चार्जेस

ICICE ही खासगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. येथेही लॉकरच्या आकारानुसार शुल्क आकारले जाते. नियमानुसार, बँक लहान आकाराच्या लॉकरसाठी 1200-5000 रुपयांपर्यंत शुल्क आकारत आहे. तर, मध्यम आकाराच्या लॉकरसाठी 2000 रुपये ते 9000 रुपये शुल्क आकारले जाते. लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंच्या किंमतीनुसार लॉकर चार्जेस देखील वाढवले ​​जातात.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक