Lokmat Money > बिझनेस न्यूज > आरबीआयची वॉररूम २४ तास सक्रिय; वित्तीय प्रणाली सहीसलामत ठेवण्यासाठी ९० कर्मचारी करतात काम

आरबीआयची वॉररूम २४ तास सक्रिय; वित्तीय प्रणाली सहीसलामत ठेवण्यासाठी ९० कर्मचारी करतात काम

व्यवसाय आकस्मित योजना नियमावलीतहत ९० कर्मचाऱ्यांपैकी निम्मे कर्मचारी सूचनेनुसार निर्धारित वेळेत उपस्थित राहतील. याशिवाय बाह्य विक्रेत्यांची ६० आणि अन्य सुविधा केंद्रातील ७० कर्मचारी वॉररूमसाठी आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 03:42 AM2020-03-23T03:42:04+5:302020-03-23T06:09:21+5:30

व्यवसाय आकस्मित योजना नियमावलीतहत ९० कर्मचाऱ्यांपैकी निम्मे कर्मचारी सूचनेनुसार निर्धारित वेळेत उपस्थित राहतील. याशिवाय बाह्य विक्रेत्यांची ६० आणि अन्य सुविधा केंद्रातील ७० कर्मचारी वॉररूमसाठी आहेत.

RBI Warroom 2 Hours Active; 90 employees work to keep the financial system in sync | आरबीआयची वॉररूम २४ तास सक्रिय; वित्तीय प्रणाली सहीसलामत ठेवण्यासाठी ९० कर्मचारी करतात काम

आरबीआयची वॉररूम २४ तास सक्रिय; वित्तीय प्रणाली सहीसलामत ठेवण्यासाठी ९० कर्मचारी करतात काम

मुंबई : कोरोनाच्या साथीपासून वित्तीय प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनेही (आरबीआय) युद्धपातळीवर पावले उचलत एक युद्धकक्ष (वॉररूम) सुरू केला आहे. व्यवसाय आकस्मिक योजनेचा भाग म्हणून १९ मार्चपासून सुरू करण्यात आलेला हा वॉररूम महत्त्वाच्या ९० कर्मचाऱ्यांमार्फत चोवीस तास चालविला जात आहे. ही वॉररूम एका दिवसात स्थापन करण्यात आली.
वॉररूममध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेतील ९० महत्त्वाचे कर्मचारी कार्यरत आहेत. व्यवसाय आकस्मित योजना नियमावलीतहत ९० कर्मचाऱ्यांपैकी निम्मे कर्मचारी सूचनेनुसार निर्धारित वेळेत उपस्थित राहतील. याशिवाय बाह्य विक्रेत्यांची ६० आणि अन्य सुविधा केंद्रातील ७० कर्मचारी वॉररूमसाठी आहेत.

वॉररूममध्ये काय चालते काम?
वॉररूमध्ये कर्ज व्यवस्थापन, गंगाजळी व्यवस्थापन आणि वित्तीय यासारखी महत्त्वाची कामे हाताळली जातात. व्यवसाय आकस्मिक योजनेतहत आरबीआयची डाटा केंद्रे एसएमएमएस, आरटीजीएस, एनईएफटी यासारख्या कार्यप्रणाली चालविते. यात ई-कुबेर प्रणालीचाही समावेश आहे. यात केंद्र आणि राज्य सरकारचे आर्थिक व्यवहार, आंतरबँक व्यवहारासह अन्य व्यवहाराचा समावेश आहे.
दरदिवशी आरबीआयचे देशभरातील ३१ प्रादेशिक आणि मुंबईतील केंद्रीय कार्यातील १४ हजार कर्मचारी अब्जावधीचे व्यवहार हाताळत असतात. उपरोल्लेखित महत्त्वाची कामे दीड हजार कर्मचारी पाहतात. आता एकूण कर्मचाºयांपैकी फक्त १० टक्के कर्मचारी कार्यालयात येतात.

Web Title: RBI Warroom 2 Hours Active; 90 employees work to keep the financial system in sync

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.