मुंबई : रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया येत्या शुक्रवारी सलग पाचव्या वेळेस महत्वाच्या धोरण व्याज दरात कपात करू शकेल. केंद्र सरकारने चलनवाढीच्या पार्श्वभूमीवर सणांच्या दिवसांत आर्थिक उलाढालीला वेग यावा यासाठी नुकताच कार्पोरेट टॅक्स खाली आणला.
बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक धोरण समिती २०१९-२०२० वर्षासाठीच्या चौथ्या द्विमासिक आर्थिक धोरणाची घोषणा तीन आॅक्टोबर रोजी करील. रिझर्व्ह बँकेने आधीच छोट्या मुदतीसाठीच्या कर्जावरील व्याजदरात गेल्या जानेवारीपासून चार वेळा कपात केलेली आहे व ती एकूण १.१० टक्के झाली आहे. गेल्या आॅगस्ट महिन्यात झालेल्या बैठकीत कर्जावरील व्याजाचा दर अनपेक्षित असा ३५ बेसिस पॉर्इंटसने कमी करून तो ५.४० टक्क्यांवर आणला. एक आॅक्टोबरपासून कर्ज घेणाऱ्यांना नियोजित कपात व्याजदराचा लाभ व्हावा यासाठी बँकांनी कर्जाच्या योजना रेपो दराशी जोडून घ्याव्यात, असे बंधन आरबीआयने घातले.
आरबीआय करणार व्याज दरात कपात
रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया येत्या शुक्रवारी सलग पाचव्या वेळेस महत्वाच्या धोरण व्याज दरात कपात करू शकेल.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 04:32 AM2019-09-30T04:32:39+5:302019-09-30T04:32:55+5:30