अर्थव्यवस्थेनं अद्यापही गती पकडलेली नसून ती हळूहळू रुळावर येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी दिली. रिझर्व्ह बॅंकेकडून मोठ्या प्रमाणात रोख रकमेच्या उपलब्धतेमुळे सरकारला कमी दराने आणि कोणत्याही अडचणीशिवाय मोठ्या प्रमाणात कर्ज दिले गेले आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक असलेली पावले उचलण्यास केंद्रीय बँक पूर्णतः तयार आहे.
फिक्कीच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीला संबोधित करताना RBI प्रमुख म्हणाले की, अर्थव्यवस्था अद्याप रुळावर आलेली नाही. जीडीपीच्या घसरलेल्या आकडेवारीवरून अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका बसल्याचं निदर्शनास येत आहे. मागील दशकात ही पहिली वेळ आहे की कर्जाची किंमत इतकी खाली आली आहे. अत्यल्प रोख उपलब्धतेमुळे सरकारची कर्ज घेण्याची जोखीम अत्यंत कमी आहे आणि गेल्या दहा वर्षात सध्या बाँडच्या माध्यमातून येणारे उत्पादन कमी स्तरावर आहे. एवढेच नव्हे, तर ते असेही म्हणाले की, शिक्षणाने आर्थिक विकासाला हातभार लावला आहे, असे एक नवीन शिक्षण धोरण ऐतिहासिक आहे आणि नवीन काळातील सुधारणांसाठी ते आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यामध्ये संशोधन, नावीन्य, पर्यटन, खाद्य प्रक्रिया क्षेत्रात खासगी क्षेत्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावायला हवी.
बर्याच रेटिंग एजन्सींनी चालू आर्थिक वर्षात भारताच्या विकासदरात घट होण्याची शक्यता वर्तविली आहे. अशा परिस्थितीत आरबीआयचं हे विधान खूप महत्त्वाचं आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत नऊ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने 2020-21पर्यंतच्या भारताच्या वाढीचा अंदाज नऊ टक्क्यांपर्यंत खाली आणला. भारतीय अर्थव्यवस्थेत मूडीजच्या 11.5 टक्के आणि चालू आर्थिक वर्षात 10.5 टक्के घट होण्याचा अंदाज आहे. गोल्डमॅन सॅशचा अंदाज आहे की, चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 14.8 टक्क्यांनी घसरेल.
अर्थव्यवस्थेसाठी RBI हरेक महत्त्वाचे पाऊल उचलणार- शक्तिकांत दास
अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक असलेली पावले उचलण्यास केंद्रीय बँक पूर्णतः तयार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 01:30 PM2020-09-16T13:30:04+5:302020-09-16T13:30:21+5:30