Lokmat Money > बिझनेस न्यूज > RBI चा मोठा निर्णय; 500 रुपयांपर्यंतच्या UPI पेमेंटसाठी 'पिन' आवश्यक नाही

RBI चा मोठा निर्णय; 500 रुपयांपर्यंतच्या UPI पेमेंटसाठी 'पिन' आवश्यक नाही

आज भारतात लाखो लोक दैनंदिन व्यवहारांसाठी UPI चा वापर करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 02:38 PM2023-08-10T14:38:57+5:302023-08-10T14:39:07+5:30

आज भारतात लाखो लोक दैनंदिन व्यवहारांसाठी UPI चा वापर करतात.

RBI's big decision; No 'PIN' is required for UPI payments up to Rs 500 in UPI light version | RBI चा मोठा निर्णय; 500 रुपयांपर्यंतच्या UPI पेमेंटसाठी 'पिन' आवश्यक नाही

RBI चा मोठा निर्णय; 500 रुपयांपर्यंतच्या UPI पेमेंटसाठी 'पिन' आवश्यक नाही

UPI Payments: भारतात आज लाखो-करोडो लोकांकडे स्मार्टफोन आहे आणि यातील अनेकजण UPI वापरतात. यातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी UPI युजर्ससाठी मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय UPI Lite वापरणाऱ्या युजर्ससाठी आहे. RBI ने UPI Lite युजर्सची पेमेंट मर्यादा वाढवली आहे. आता युजर्स या फीचरद्वारे 500 रुपयांपर्यंतचे पेमेंट करू शकतील आणि यासाटी त्यांना कुठलाही पिन टाकण्याची गरज नाही. यासोबतच सरकारने ऑफलाइन पेमेंट मोड सुरू करण्याची घोषणाही केली आहे. 

लिमिट में किया इजाफा
बँकांकडून प्रोसेसिंगमध्ये काही समस्या आल्यावर युजरला त्रास होऊ नये, यासाठीच यूपीआय लाइट व्हर्जन लॉन्च करण्यात आले होते. यूपीआय वापरणारा प्रत्येक युजर यूपीआय लाइट वापरू शकतो. यूपीआईद्वारे दररोज एक लाख रुपयांचा व्यवहार करता येतो, तर यूपीआय लाइटद्वारे आता 500 रुपयांचे व्यवहार करता येणार आहेत. यापूर्वी फक्त 200 रुपयांची लिमिट होती. शक्तिकांत दास म्हणाले की, या सुविधेमुळे फक्त रिटेल क्षेत्र डिजिटली सक्षम होणार नाही, तर इंटरनेट/टेलिकॉम कनेक्टिव्हिटी कमकुवत असलेल्या किंवा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी अल्प रकमेचे व्यवहार करता येतील.

AI आधारित व्यवहारही सुरू होईल
लवकरच यूपीआयवर नवीन पेमेंट मोड, म्हणजेच कन्व्हर्सेशनल पेमेंट्सची सुविधा सुरू होणार आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, य्दावेर युजर्स व्यवहारांसाठी आर्टिफिशियल इंटेलीजन्स AI बेस्ड सिस्टमसोबत संवाद साधू शकतील. याद्वारे एकदम सुरक्षित व्यवहार होतील. हा पर्याय स्मार्टफोन आणि फीचर फोन बेस्ड यूपीआय प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध असेल. यामुळे देशात डिजिटल सेक्टरचा विस्तार होईल. हिंदी आणि इंग्रजीनंतर याला भारतातील इतर भाषांमध्येही उपलब्ध केले जाईल. या सर्व घोषणांबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ला लवकरच सूचना जारी केल्या जातील.

Web Title: RBI's big decision; No 'PIN' is required for UPI payments up to Rs 500 in UPI light version

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.