Join us

खते बनवणाऱ्या 8 कंपन्यांचे होणार खाजगीकरण; सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2022 2:33 PM

Fertilizer : एका रिपोर्टनुसार, सरकारने राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर (RCF), नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड (NFL) आणि फर्टिलायझर अँड केमिकल त्रावणकोर लिमिटेड (FACT) सह 8 खत कंपन्यांची धोरणात्मक निर्गुंतवणूक पूर्ण केली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेला गती दिली आहे. खतांची निर्मिती करणाऱ्या 8 सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाला नीती आयोगाच्या बैठकीत हिरवा सिग्नल मिळाला आहे. तीन आठवड्यांपूर्वी ही बैठक झाली होती. सीएनबीसी-आवाजच्या एका रिपोर्टनुसार, सरकारने राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर (RCF), नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड (NFL) आणि फर्टिलायझर अँड केमिकल त्रावणकोर लिमिटेड (FACT) सह 8 खत कंपन्यांची धोरणात्मक निर्गुंतवणूक पूर्ण केली आहे.

सीएनबीसी-आवाजचे लक्ष्मण रॉय यांनी सांगितले की, सरकारने नवीन निर्गुंतवणूक धोरणांतर्गत या कंपन्यांचे निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक उपक्रम विभागानेही या कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीची शिफारस केली आहे. सरकारचा राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर (RCF) मध्ये 75 टक्के, नॅशनल फर्टिलायझर लिमिटेडमध्ये (NFL) जवळपास 74 टक्के आणि फर्टिलायझर अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडमध्ये (FACT) 90 टक्के हिस्सा आहे.

सरकारने सांगितलेल्या खत कंपन्यांमध्ये राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स, नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड आणि फर्टिलायझर अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडसह आठ कंपन्यांचा समावेश आहे, असे लक्ष्मण रॉय यांनी सांगितले. तसेच, मद्रास फर्टिलायझर, फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हिंदुस्तान फर्टिलायझर कॉर्पोरेशन यांचाही निर्गुंतवणुकीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर मुख्यत्वे युरिया आणि कॉम्प्लेक्स खतांचे उत्पादन करते. नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड नीम कोटेड युरिया आणि जैव खत तयार करते.

शेअर्समध्ये वाढनॅशनल फर्टिलायझर लिमिटेडच्या (NFL)  शेअर्समध्ये मंगळवारी वाढ होताना दिसून आली. इंट्राडे मध्ये कंपनीचे शेअर्स एनएमईवर 2.33 टक्क्यांच्या वाढीसह 52.70 टक्क्यांवर व्यवहार करत आहेत. तसेच, फर्टिलायझर अँड केमिकल त्रावणकोर लिमिटेडचे (FACT) शेअर्स आज 5 टक्क्यांपर्यंत वाढले आणि एकदा हा स्टॉक 129.75 रुपयांवर पोहोचला. त्याचप्रमाणे नॅशनल केमिकल फर्टिलायझरचा (RCF)  शेअर्स सुद्धा  आज जवळपास 3 टक्क्यांनी वाढून 103.70 रुपयांवर पोहोचला.

टॅग्स :व्यवसाय