नवी दिल्ली - कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सची (आरकॉम) कर्मचारी संख्या तब्बल ९४ टक्क्यांनी घटली आहे. एकेकाळी कंपनीत ५२ हजार कर्मचारी होते. आता केवळ ३,४00 कर्मचारी उरले असून, ४८ हजारांहून अधिक कर्मचारी कमी झाले आहेत. आरकॉमने मुंबई शेअर बाजारात सादर केलेल्या नियामकीय दस्तावेजात ही माहिती दिली. कंपनीने म्हटले की, २00८ ते २0१0 या काळात कंपनीकडे सर्वाधिक कर्मचारी होते.आरकॉमवर ४५ हजार कोटींचे कर्ज असून, जानेवारीत कंपनीला आपला मोबाइल सेवेचा व्यवसाय बंद करावा लागला होता.
आरकॉमच्या कर्मचाऱ्यांत तब्बल ९४% घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 1:41 AM