(वाचली) मंडोडी, डॉनीसन, आराध्य ठरले चौथ्या फेरीचे विजेते * जे.के. टायर एफएमएससीआय राष्ट्रीय गो-कार्टिंग स्पर्धा
By admin | Published: September 28, 2014 10:29 PM
कोल्हापूर : अकराव्या जे.के. टायर एफएमएससीआय राष्ट्रीय गो-कार्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत मोहितेज्च्या चित्तेश मंडोडी याने रेव रेसिंगच्या अमेय बाफनाला मागे टाकत सीनिअर मॅक्स गटातील विजेतेपद पटकाविले.
कोल्हापूर : अकराव्या जे.के. टायर एफएमएससीआय राष्ट्रीय गो-कार्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत मोहितेज्च्या चित्तेश मंडोडी याने रेव रेसिंगच्या अमेय बाफनाला मागे टाकत सीनिअर मॅक्स गटातील विजेतेपद पटकाविले. आज, रविवारी नेर्ली-तामगाव येथील मोहितेज् रेसिंग अकॅडमीच्या ट्रॅकवर झालेल्या या स्पर्धेच्या दुसरा व अंतिम दिवस मोहितेज्च्या कार रेसरनी गाजवला. यामध्ये धुव्र मोहितेने तिसर्या स्थानासाठी रेव रेसिंगच्या आर्यन गांधीला मागे टाकले, तर अमेय बाफना याने थरारक ड्रायव्हिंगचे कौशल्य उपस्थितांना दाखविले. ज्युनिअर मॅक्स गटात रिकी डॉनीसन (बीपीसी रेसिंग) याने मागील फेरीतील विजेत्या कुशमैनी यास मागे टाकत प्रथम स्थान पटकाविले, तर मेको रेसिंगचा ड्रायव्हर यश आराध्य याने मायक्रो मॅक्स गटाचे विजेतेपद पटकाविले. मंडोडी याने आज रेसला सुरुवात केली तेव्हा तो तिसर्या क्रमांकावर होता. कालच्या रेसपेक्षा आजची कामगिरी सरस होती. ---लक्ष्यवेधी चालकधुव्र मोहिते व नयन चॅटर्जी यांच्यात १५ लॅप्स्मध्ये बरोबरी होती. त्यामुळे कोण जिंकणार, ही उत्सुकता लागून राहिली होती, तर ज्युनिअर मॅक्स गटात डॉनीसन व कुशमैनी यांच्यात थरारक स्पर्धा पाहावयास मिळाली. याचबरोबर १२ वर्षीय यश आराध्य याने तिसर्या पोडीयममधून चौथ्या स्थानावरून गाडीवर योग्य नियंत्रण ठेवत बाजी मारली. ---सविस्तर निकाल असा -सीनिअर मॅक्स गट -(२० लॅप्स्) - चित्तेश मंडोडी (मोहितेज), अमेय बाफना (रेव), आर्यन गांधी (रेव), विष्णू प्रसाद (मेको), निखिल कश्यप (मेको).ज्युनिअर मॅक्स गट - (१८ लॅप्स्) - रिकी डॉनीसन (बीपीसी), कुशमैनी (डॉकडॉन), आकाश गौडा (मेको), आरोह रवींद्र (रेव), मीरा इरडा (डार्कडॉन).मायक्रो मॅक्स गट - यश आराध्य (मेको), चिराग घोरपडे (बीपीसी), निखिल बोरा (मेको), आदिल स्वामीनाथन (मेको). ----फोटो : २८कोल- जेकेफोटोओळी : अकराव्या जे.के. टायर राष्ट्रीय गो-कार्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या चौथ्या फेरीतील विजेते रिकी डॉनीसन, यश आराध्य, चित्तेश मंडोडी.----फोटो : २८कोल- जेके०१फोटोओळी : अकराव्या जे.के. टायर राष्ट्रीय गो-कार्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या चौथ्या फेरीतील विजेता चित्तेश मंडोडी आघाडीवर असतानाचे छायाचित्र.