Join us

(वाचली) पंतप्रधान मोदी यांची चारला सभा - तपोवन मैदानावरून प्रचाराचे रणशिंग फुंकणार

By admin | Published: September 28, 2014 10:29 PM

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा येत्या चार ऑक्टोबरला तपोवन मैदानावर सकाळी दहा वाजता होत आहे. विधानसभा निवडणुकीचा भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातील प्रचार प्रारंभ या सभेने होत आहे. भाजपचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी ही माहिती दिली. या सभेच्या नियोजनासंदर्भात अधिक तपशील व नियोजनाची माहिती उद्या देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा येत्या चार ऑक्टोबरला तपोवन मैदानावर सकाळी दहा वाजता होत आहे. विधानसभा निवडणुकीचा भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातील प्रचार प्रारंभ या सभेने होत आहे. भाजपचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी ही माहिती दिली. या सभेच्या नियोजनासंदर्भात अधिक तपशील व नियोजनाची माहिती उद्या देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या राज्यव्यापी प्रचाराचा प्रारंभ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व अन्य दिग्गज नेत्यांच्या उपस्थित गांधी मैदानावरील सभेने केला. त्याच्याअगोदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हमीदवाडा (ता.कागल) येथील साखर कारखाना व सरुड (ता. शाहूवाडी) येथील प्रचार सभेनी शिवसेनेने रणशिंग फुंकले आहे. आता यापाठोपाठ भाजपच्या प्रचाराच्या निमित्ताने थेट पंतप्रधानच कोल्हापुरात येत आहेत. त्यामुळे भाजपचे उमदेवार व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ही सभा कोल्हापूर दक्षिण मतदारसंघांतील तपोवन मैदानावर होत असल्याने तिला विशेष महत्त्व आले आहे.
भारतीय जनता पक्ष कोल्हापुरातील दहापैकी पाचच जागा लढवत आहे. त्यापैकी कागल मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार शोधताना दमछाक झाली परंतु तरीही कोल्हापुरात प्रचार प्रारंभ करण्यामागे महत्त्वाचे कारण आहे. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र हा दोन्ही काँग्रेसचा व त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या प्रदेशात भाजपला आजपर्यंत म्हणावे तेवढे राजकीय पाठबळ मिळालेले नाही. कोल्हापुरात पडलेल्या ठिणगीचा वणवा संपूर्ण राज्यभरात पोहोचतो म्हणून भाजपने पंतप्रधानांची सभा कोल्हापुरात घेऊन शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक विधानसभेची जरी असली तरी हा पक्ष मोदी आणि कमळ या दोनच गोष्टी घेऊन मैदानात उतरत आहे. मोदी आणि कमळ यांच्या प्रचाराची प्रचंड मोठी होडिंग्ज राज्य भाजपतर्फे आज कोल्हापुरात विविध भागांत लावण्यात आली आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरात व्हावी. यासाठी शिवसेना व भाजपचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यातर्फे खूप प्रयत्न झाले. मोदी त्यावेळी सांगली येथे झालेल्या सभेला जाण्यासाठी कोल्हापूर विमानतळ येथे आले होते. परंतु त्यांची सभा मात्र होऊ शकली नाही. ही सभा झाली असती तर कोल्हापुरातून संजय मंडलिक हे विजयी झाले असते, अशी चर्चा निकालानंतर झाली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही चूक दुरुस्त करून भाजप विधानसभेच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फोडणार आहे.