Lokmat Money > बिझनेस न्यूज > विराट युद्धनौका १०० कोटी रुपयांना विकण्याची तयारी

विराट युद्धनौका १०० कोटी रुपयांना विकण्याची तयारी

विद्यमान मालकाचा प्रस्ताव; अन्यथा तोडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 02:02 AM2020-10-03T02:02:48+5:302020-10-03T02:03:22+5:30

विद्यमान मालकाचा प्रस्ताव; अन्यथा तोडणी

Ready to sell huge warships for Rs 100 crore | विराट युद्धनौका १०० कोटी रुपयांना विकण्याची तयारी

विराट युद्धनौका १०० कोटी रुपयांना विकण्याची तयारी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पराक्रमी इतिहासाची साक्षीदार असलेली व जुनाट झाल्याने तीन वर्षांपूर्वी या दलाच्या ताफ्यातून काढण्यात आलेली आयएनएस विराट ही विमानवाहू युद्धनौका मुंबईतील एन्व्हिटेक मरिन कन्सल्टंट्स या कंपनीला १०० कोटी रुपयांना विकण्याची तयारी या युद्धनौकेची विद्यमान मालक असलेल्या श्रीराम ग्रुपने दाखविली आहे.

भारतीय नौदलाच्या ताफ्यात विराट नौकेचा १९८७ साली समावेश करण्यात आला व तिला २०१७ साली सेवेतून निरोप देण्यात आला. त्यानंतर ही युद्धनौका श्रीराम ग्रुपने ३८.५४ कोटी रुपयांना जुलै महिन्यात विकत घेतली.

सवलतीचा प्रस्ताव आठवड्यापुरताच
एन्व्हिटेक मरिन कन्सल्टंट्सने विराट ही विमानवाहू युद्धनौका विकत घेण्यासाठी सर्वप्रथम श्रीराम ग्रुपच्या मुकेश पटेल यांना संपर्क साधला त्यावेळी त्यांनी युद्धनौकेची किंमत १२५ कोटी रुपये सांगितली; पण त्यानंतर पटेल हे १०० कोटींना ही नौका विकण्यास तयार झाले.

Web Title: Ready to sell huge warships for Rs 100 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.