Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिअल इस्टेट गुंतवणूकदार छोट्या शहरांकडे वळला

रिअल इस्टेट गुंतवणूकदार छोट्या शहरांकडे वळला

रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूकदार आता केवळ मोठ्या मेट्रो शहरांपुरताच मर्यादित राहिलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 05:06 AM2019-05-29T05:06:24+5:302019-05-29T05:06:29+5:30

रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूकदार आता केवळ मोठ्या मेट्रो शहरांपुरताच मर्यादित राहिलेला नाही.

Real estate investor turned to small cities | रिअल इस्टेट गुंतवणूकदार छोट्या शहरांकडे वळला

रिअल इस्टेट गुंतवणूकदार छोट्या शहरांकडे वळला

नवी दिल्ली : रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूकदार आता केवळ मोठ्या मेट्रो शहरांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. दुसऱ्या व तिसºया श्रेणीतील शहरांतील प्रकल्पांतही आता तो गुंतवणूक करू लागला आहे, असा निष्कर्ष अ‍ॅनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे.
अ‍ॅनारॉकने जारी केलेल्या ‘ग्राहक धारणा सर्वेक्षणा’नुसार, २६ टक्के मालमत्ता गुंतवणूकदार आता दुसºया व तिसºया श्रेणीतील शहरांना प्राधान्य देऊ लागले आहेत. महाराष्ट्रातील नाशिक, तसेच अन्य राज्यांतील अहमदाबाद, जयपूर, चंदीगड आणि कोची या शहरांत चांगली मालमत्ता गुंतवणूक होताना दिसत आहे.
बंगळुरू आणि पुणे ही शहरेही मालमत्ता गुंतवणुकीसाठी ‘हॉट स्पॉट’ ठरली आहेत. या शहरांना सर्वेक्षणात अनुक्रमे २१ आणि १८ टक्के मते मिळाली आहेत.
अ‍ॅनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले की, मेट्रो शहरांच्या तुलनेत छोट्या शहरांतील मालमत्तांच्या किमती परवडण्याजोग्या आहेतच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या शहरांत वृद्धीच्या शक्यताही अधिक आहेत. या शहरांना सरकारच्या स्मार्ट सिटी आणि अमृत यासारख्या योजनांनीही महत्त्व प्राप्त करून दिले आहे.
मेट्रो शहरांच्या तुलनेत या शहरांत या योजनांची अंमलबजावणी करणे अधिक सोपे आहे. योजनांची पूर्ण अंमलबजावणी होईल, तेव्हा या शहरांतील रिअल इस्टेट बाजारावर मोठा परिणाम झालेला असेल.
>मुंबईकर देतात पुण्याला प्राधान्य
सर्वेक्षणात म्हटले आहे की, आपल्या निवासाच्या शहरांपासून जवळ असलेल्या शहरांना लोक प्राधान्य देत असल्याचे आढळून आले आहे. उदा. चेन्नईत राहणाºया २१ टक्के लोकांनी वेल्लोर, कोइम्बतूर आणि महाबलीपुरम या शहरांना प्राधान्य दिले. त्यांच्यासाठी बंगळुरू दुसरा पर्याय होता. दिल्लीतील १२ टक्के लोकांनी सोनिपत, जयपूर आणि चंदीगडला प्राधान्य दिले. मुंबईतील लोकांनी पुण्याला प्राधान्य दिले.

Web Title: Real estate investor turned to small cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.