नवी दिल्ली : ३,५४0 रिअल इस्टेट प्रकल्पांपैकी ७५ टक्के प्रकल्प २0१४-१५ पर्यंत सुरू होऊ शकले नाहीत. रखडलेल्या या प्रकल्पांची एकत्रित किंमत तब्बल १४ लाख कोटी रुपये आहे. असोचेमच्या एका अभ्यासात ही माहिती समोर आली.
असोचेमच्या अहवालात म्हटले की, भारताच्या सर्वच ठिकाणी रिअल इस्टेट प्रकल्प रखडले आहेत. एकूण २,३00 प्रकल्प या ना त्या कारणांनी अडकले आहेत. याशिवाय आणखी १ हजार प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकलेले नाहीत. असोचेमच्या अभ्यासानुसार, उशीर झालेल्या ९६४ प्रकल्प खाजगी क्षेत्राचे आहेत. ४९ प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील आहेत. विदेशी खाजगी कंपन्यांचे ६ प्रकल्पही रखडले आहेत.
असोचेमचे सरचिटणीस डी.एस. रावत यांनी म्हटले की, भारतातील रिअल्ट इस्टेट प्रकल्प पूर्ण होण्यास सरासरी ३३ महिन्यांचा उशीर झाला आहे.
आर्थिक वाढ हवी
अडकलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आर्थिक वाढीला गती देणे आवश्यक आहे. गृहकर्जावरील व्याजदर आणखी कमी होणे आवश्यक आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रकल्प अडकले
३,५४0 रिअल इस्टेट प्रकल्पांपैकी ७५ टक्के प्रकल्प २0१४-१५ पर्यंत सुरू होऊ शकले नाहीत. रखडलेल्या या प्रकल्पांची एकत्रित किंमत तब्बल १४ लाख कोटी रुपये आहे.
By admin | Published: October 23, 2015 02:43 AM2015-10-23T02:43:12+5:302015-10-23T02:43:12+5:30