Join us

प्राप्तीकराचा परतावा १० दिवसांत मिळणार

By admin | Published: September 14, 2015 1:00 AM

प्राप्तीकर विभाग आता ७ ते १० दिवसांच्या आत करदात्यांना परतावा संबंधितांच्या खात्यात जमा करणार आहे. करदात्यांसाठी ही एक अत्यंत चांगली बातमी आहे.

नवी दिल्ली : प्राप्तीकर विभाग आता ७ ते १० दिवसांच्या आत करदात्यांना परतावा संबंधितांच्या खात्यात जमा करणार आहे. करदात्यांसाठी ही एक अत्यंत चांगली बातमी आहे.विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी केल्याने हे शक्य झाले आहे. आयकर रिटर्नची पडताळणी किंवा अन्य बँक डेटाबेसद्वारे करण्याने तसेच विभागाच्या आयटीआर दाखल करण्याच्या ताज्या उपायांनी हा सकारात्मक निष्कर्ष निघाला. त्यामुळे कर अधिकारी कर आकलन वर्ष २०१५-१६ साठी रिफंड १५ दिवसांपेक्षा कमी अवधीत बँक खात्यात जमा करू शकले.या प्रक्रियेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यापूर्वी प्राप्तीकराचा रिफंड मिळण्यास कित्येक महिने किंवा काही प्रकरणांत वर्षे लागत असत; पण आता ते प्रकरण इतिहासजमा झाले. आता आयटीआरची प्रणाली खूपच यशस्वी झाली आहे. त्याचमुळे करदात्यांचे आभार मानण्याचा एक भाग म्हणून परतावा ७ ते १० दिवसांत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.विभागाच्या सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरने (सीपीसी) ७ सप्टेंबरपर्यंत ४५.१८ लाख रिटर्नची पडताळणी केली आणि २२.१४ लाख करदात्यांना परतावा परत केला.