Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारी कंपनीकडून मिळाली ऑर्डर, रॉकेट बनला इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित शेअर; ₹129 वर पोहोचला भाव

सरकारी कंपनीकडून मिळाली ऑर्डर, रॉकेट बनला इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित शेअर; ₹129 वर पोहोचला भाव

सर्व्होटेक पॉवर सिस्टीम्स लिमिटेडला BPCL कडून इंडियन PXU भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (BPCL) 20 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. यानंतर या शेअरमध्ये जोरदार खरेदी दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 06:01 PM2024-07-25T18:01:02+5:302024-07-25T18:02:04+5:30

सर्व्होटेक पॉवर सिस्टीम्स लिमिटेडला BPCL कडून इंडियन PXU भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (BPCL) 20 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. यानंतर या शेअरमध्ये जोरदार खरेदी दिसून आली.

Received order from government company servotech power systems shares related to electric vehicles become rocket; The price reached ₹129 | सरकारी कंपनीकडून मिळाली ऑर्डर, रॉकेट बनला इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित शेअर; ₹129 वर पोहोचला भाव

सरकारी कंपनीकडून मिळाली ऑर्डर, रॉकेट बनला इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित शेअर; ₹129 वर पोहोचला भाव

शेअर बाजारात आज सर्व्होटेक पॉवर सिस्टीम्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी बघायला मिळाली. सर्व्होटेक पॉवर सिस्टीम्स लिमिटेडचा शेअर आज NSE वर 123 रुपयांच्या खाली खुला झाला आणि 129 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. सर्व्होटेक पॉवर सिस्टीम्स लिमिटेडला BPCL कडून इंडियन PXU भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (BPCL) 20 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. यानंतर या शेअरमध्ये जोरदार खरेदी दिसून आली.

कंपनीने बीपीसीएलकडून मिळालेल्या ऑर्डरसंदर्भात भारतीय शेअर बाजाराला माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे, "EV चार्जर्स आणि सोलर सोल्यूशन्सच्या बाबतीत आघाडीची उत्पादक कंपनी सर्व्होटेक पॉवर सिस्टीम्स लिमिटेडला अतिरिक्त ऑर्डर मिळाली आहे. चार शे डीसी फास्ट ईव्ही चार्जर्स युनिट्स भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि इतर ईव्ही चार्जर ओईएमकडून उपलब्ध आहे. अंदाजे 20 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये BPCL ई-ड्राइव्ह प्रकल्पाचा भाग म्हणून देशभरातील BPCL पेट्रोल पंपांवर या चार्जर्सचे उत्पादन, पुरवठा, आणि ते लावण्याचा समावेश असेल.

काय म्हणते कंपनी? -
सर्व्होटेक पॉवर सिस्टीम्स लिमिटेडच्या संचालक सारिका भाटिया बीपीसीएलच्या आदेशावर म्हणाल्या, "बीपीसीएलसाठी काम करणे ही सर्व्होटेकसाठी आनंदाची गोष्ट आहे. बीपीसीएलने आमच्यावर जो विश्वासव्यक्तकेला आहे, तो सार्थ ठरवण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. आमचे इको-कॉन्शियस आणि अव्वल दर्जाचे ईव्ही चार्जर भारतभर शाश्वत ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्सची वाढती मागणी पूर्ण करतात. 

Web Title: Received order from government company servotech power systems shares related to electric vehicles become rocket; The price reached ₹129

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.