Lokmat Money > बिझनेस न्यूज > Google Pay च्या माध्यमातून 'असा'  करा रिचार्ज तुमचा FASTag; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Google Pay च्या माध्यमातून 'असा'  करा रिचार्ज तुमचा FASTag; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Google Pay FASTag Recharge : अगदी सोप्या पद्धतीनं 'गुगल पे'च्या माध्यमातून तुम्हाला 'फास्टॅग' रिचार्ज करता येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 03:39 PM2022-03-18T15:39:44+5:302022-03-18T15:41:05+5:30

Google Pay FASTag Recharge : अगदी सोप्या पद्धतीनं 'गुगल पे'च्या माध्यमातून तुम्हाला 'फास्टॅग' रिचार्ज करता येणार आहे.

Recharge your FASTag through Google Pay; See step by step process | Google Pay च्या माध्यमातून 'असा'  करा रिचार्ज तुमचा FASTag; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Google Pay च्या माध्यमातून 'असा'  करा रिचार्ज तुमचा FASTag; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Google Pay FASTag Recharge : FASTag ही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (National Highways Authority of India) चालवली जाणारी एक इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली (Electronic Toll Collection) आहे. रेडियो फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी (radio frequency identification technology) वर ही प्रणाली काम करते. याच्या माध्यमातून कोणत्याही टोल नाक्यावर (Toll) न थांबता टोलची रक्कम भरता येते. गुगल पे द्वारेही तुम्हाला तुमचा FASTag अकाऊंट लिंक करता येतो. 

यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम Google Pay च्या बिल पेमेंट्स ऑप्शनमध्ये जावं लागेल. त्यानंतर त्यात असलेल्या कोणत्याही एका बँक अकाऊंटला सिलेक्ट करावं लागेल. Google Pay च्या माध्यमातून FASTag रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला Google Pay FASTag अकाऊंटचा वापर करावा लागेल. हे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसशी (UPI) जोडलेलं असेल.

कसं कराल लिंक?  

  • सर्वप्रथम तुम्हाला FASTag अकाऊंटला लिंक करावं लागेल.
  • तुमच्या Android किंवा iPhone मध्ये Google Pay अॅप ओपन करा.
  • त्यानंतर New Payment बटन वर क्लिक करा. 
  • यानंतर सर्चबारमध्ये  FASTag सर्च करावं लागेल.
  • त्यानंतर खाली तुम्हाला FASTag इश्यू करणारी बँक सिलेक्ट करावी लागेल.
  • आता Get Started सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वाहनाचा नंबर एन्टर करावा लागेल आणि अकाऊंटला नाव द्यावं लागेल.
  • आता स्क्रीनच्या खाली असलेल्या लिंक अकाऊंट बटनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला अकाऊंट रिव्ह्यू करावा लागेल. यामध्ये अकाऊंट होल्डरचं नाव आणि वाहनाचा नंबर यांचा समावेश असेल.
  • रिव्ह्यू केल्यानंतर लिंक अकाऊंट बटनावर क्लिक करा. त्यानंतर किमान २०० रुपयांच्या पेमेंट्ससाठी बटनावर टॅप करा. नंतर टिक वर क्लिक करा.
  • स्क्रीनच्या खाली Pay बटनावर क्लिक करा. गुगल पे अॅप यानंतर तुमच्याकडून UPI पिन मागेल. पिन एन्टर केल्यानंतर तुमचं पेमेंट होईल.
  • पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला Google Pay शी जोडलेल्या अकाऊंटवरून एक एसएमएस मिळेल.

Web Title: Recharge your FASTag through Google Pay; See step by step process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.