Lokmat Money > बिझनेस न्यूज > सिलिकॉन व्हॅलीला महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीची मान्यता

सिलिकॉन व्हॅलीला महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीची मान्यता

नाशिक : गेल्या १८ वर्षांपासून आयटी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सिलिकॉन व्हॅली संस्थेला महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीची (एमएसएसडीएम) मान्यता मिळाली असल्याची माहिती संचालक प्रमोद गायकवाड यांनी दिली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2016 10:20 PM2016-07-06T22:20:39+5:302016-07-07T00:53:19+5:30

नाशिक : गेल्या १८ वर्षांपासून आयटी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सिलिकॉन व्हॅली संस्थेला महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीची (एमएसएसडीएम) मान्यता मिळाली असल्याची माहिती संचालक प्रमोद गायकवाड यांनी दिली.

Recognition of Maharashtra Skill Development Society, Silicon Valley | सिलिकॉन व्हॅलीला महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीची मान्यता

सिलिकॉन व्हॅलीला महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीची मान्यता

नाशिक : गेल्या १८ वर्षांपासून आयटी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सिलिकॉन व्हॅली संस्थेला महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीची (एमएसएसडीएम) मान्यता मिळाली असल्याची माहिती संचालक प्रमोद गायकवाड यांनी दिली.
सिलिकॉन व्हॅली कॅप्समध्ये ट्रॅव्हल-टूरिझम, मटेरीयल मॅनेजमेंट, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट हे महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट मान्यतेचे अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. एमएसएसडीएस ही महाराष्ट्र शासनातर्फे चालविली जाणारी संस्था असून, जास्तीत-जास्त तरुणांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन रोजगार तसेच स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तिची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी एक महिन्यापासून ते वर्षभरापर्यंत कालावधीचे रोजगाराभिमुख अनेक अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून, राज्यातील काही निवडक संस्थांच्या माध्यमातून ही शिबिरे राबविण्याची योजना आहे. प्रशिक्षणानंतर मुलांना टूरिझम, आयटी, सेवा क्षेत्र किंवा उद्योग व्यवसायात नोकरी मिळवून देण्यासाठी सहकार्य केले होते.
या अभ्यासक्रमासाठी सिलिकॉन व्हॅलीला मान्यता मिळाली असून, कॉलेज रोडवरील कार्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ०२५३-२५८२९३० किंवा ९४३३७७४३२५ यावर संपर्क साधण्याचे आवाहन संचालकांनी केले आहे. (वा.प्र.)

Web Title: Recognition of Maharashtra Skill Development Society, Silicon Valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.