Lokmat Money > बिझनेस न्यूज > उसाचा दर साखरेच्या दराशी जोडण्याची शिफारस

उसाचा दर साखरेच्या दराशी जोडण्याची शिफारस

२० लाख टन उसाचे उत्पादन करणारे ३ लाख हेक्टर ऊस क्षेत्र इतर पिकाखाली आणण्याची गरज आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 02:36 AM2020-08-22T02:36:35+5:302020-08-22T02:36:40+5:30

२० लाख टन उसाचे उत्पादन करणारे ३ लाख हेक्टर ऊस क्षेत्र इतर पिकाखाली आणण्याची गरज आहे.

Recommendation to add sugarcane price to sugar price | उसाचा दर साखरेच्या दराशी जोडण्याची शिफारस

उसाचा दर साखरेच्या दराशी जोडण्याची शिफारस

नवी दिल्ली : उसाचा दर साखरेच्या दराशी जोडण्याची शिफारस नीती आयोगाच्या कृती दलाने केली आहे. कारखान्यांना दिलासा देण्यासाठी साखरेचे किमान दर एकरकमी वाढवून ३३ रुपये किलो करण्याची शिफारसही कृती दलाने केली आहे. नीती आयोगाचे सदस्य रमेशचंद यांच्या नेतृत्वाखालील कृती दलाने ‘ऊस आणि साखर उद्योग’ नावाचा अहवाल मार्च २०२० मध्ये पूर्ण केला होता. हा अहवाल आयोगाच्या वेबसाइटवर टाकण्यात आला आहे.
त्यात ही शिफारस करण्यात आली आहे. उसाखालील काही क्षेत्र कमी पाणी लागणाऱ्या पिकाकडे वळविण्यात यावे. त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य प्रोत्साहन लाभ देण्यात यावा, असे अहवालात म्हटले आहे. २० लाख टन उसाचे उत्पादन करणारे ३ लाख हेक्टर ऊस क्षेत्र इतर पिकाखाली आणण्याची गरज आहे.

Web Title: Recommendation to add sugarcane price to sugar price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.