Lokmat Money > बिझनेस न्यूज > भाड्याचे नको, स्वतःचे घर हवे; रेकॉर्डब्रेक विक्री, घरांची विक्री ८७ टक्क्यांनी वाढली

भाड्याचे नको, स्वतःचे घर हवे; रेकॉर्डब्रेक विक्री, घरांची विक्री ८७ टक्क्यांनी वाढली

सन २०२२ च्या पहिल्या सहामाहीत ०५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या ३३,२१० घरांची विक्री झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 10:24 AM2022-10-03T10:24:45+5:302022-10-03T10:25:36+5:30

सन २०२२ च्या पहिल्या सहामाहीत ०५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या ३३,२१० घरांची विक्री झाली.

record breaking sales of houses in 2022 home sales up 87 percent | भाड्याचे नको, स्वतःचे घर हवे; रेकॉर्डब्रेक विक्री, घरांची विक्री ८७ टक्क्यांनी वाढली

भाड्याचे नको, स्वतःचे घर हवे; रेकॉर्डब्रेक विक्री, घरांची विक्री ८७ टक्क्यांनी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशात अर्थव्यवस्था रुळावर आली असून, कोरोनानंतर लोक आता भाड्याच्या ऐवजी स्वत:च्या घरात राहण्यास पसंती देत आहेत. यामुळे देशात घरांची रेकॉर्डब्रेक विक्री होत आहे. देशाच्या सात प्रमुख शहरांमध्ये या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान घरांची विक्री ८७%नी वाढून २,७२,७०९ इतकी झाली आहे. एनारॉकच्या अहवालानुसार, जोरदार मागणीमुळे घरांची विक्री कोरोनापूर्व पातळीवर म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या विक्रीपेक्षा अधिक आहे. २०२१ मध्ये जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान १,४५,६५१ घरांची विक्री झाली होती.

२ नव्हे तर ३ बीएचके घरांची मागणी वाढली

महागाईमुळे घरांच्या किमतीत सरासरी ७ टक्के तर गृहकर्जाच्या व्याज दरात १.४० टक्के वाढ झालेली असतानाही देशातील ८ प्रमुख शहरांत २ नव्हे तर ३ बीएचके घरांची मागणी वाढली वाढली आहे. प्रॉपटायगरने जारी केलेल्या अहवालानुसार, सप्टेंबरच्या तिमाहीत ८३,२२० घरांची विक्री झाली. 

कोरोनाआधीपेक्षाही अधिक संख्येने घरांची विक्री 

८३,२२० घरांची सप्टेंबर २०२२ च्या तिमाहीत झाली विक्री.

५५,९१० घरांची सप्टेंबर २०२१ च्या तिमाहीत झाली होती विक्री.

०५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या ३३,२१० घरांची २०२२ च्या पहिल्या सहामाहीत झाली विक्री.

१६,११० घरे विकली २०१९ च्या पहिल्या सहामाहीत, ज्यांची किंमत होती ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक.

महाराष्ट्रात का मिळाला घरविक्रीला बूस्टर? 

- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सरकारने मुद्रांक शुल्क माफ केले होते. 

- इतर राज्यांनीही घर विक्री वाढण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. 

- त्यामुळे भारतात घरांच्या विक्रीत वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

कोणत्या शहरात किती विक्री

मुंबई २८,८००

पुणे १५,७००

हैदराबाद १०,५७०

बंगळुरू ७,८९०

अहमदाबाद ७,८८०

दिल्ली ५,४३०
 

Web Title: record breaking sales of houses in 2022 home sales up 87 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.