Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुंबईत नऊ वर्षांतील विक्रमी गृहविक्री, गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी वाढ

मुंबईत नऊ वर्षांतील विक्रमी गृहविक्री, गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी वाढ

Mumbai Home News : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईतील गृहविक्रीची संख्या ६० टक्क्यांनी वाढली असतानाच नोव्हेंबर महिन्यातील गृहविक्री गेल्या ९ वर्षांतील सर्वाधिक असल्याची माहिती हाती आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 07:48 AM2020-12-11T07:48:44+5:302020-12-11T07:49:31+5:30

Mumbai Home News : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईतील गृहविक्रीची संख्या ६० टक्क्यांनी वाढली असतानाच नोव्हेंबर महिन्यातील गृहविक्री गेल्या ९ वर्षांतील सर्वाधिक असल्याची माहिती हाती आली आहे.

Record home sales in nine years in Mumbai | मुंबईत नऊ वर्षांतील विक्रमी गृहविक्री, गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी वाढ

मुंबईत नऊ वर्षांतील विक्रमी गृहविक्री, गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी वाढ

मुंबई : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईतील गृहविक्रीची संख्या ६० टक्क्यांनी वाढली असतानाच नोव्हेंबर महिन्यातील गृहविक्री गेल्या ९ वर्षांतील सर्वाधिक असल्याची माहिती हाती आली आहे. २०१२ ते २०१९ या कालावधीतल्या सप्टेंबर महिन्यातील सर्वाधिक ६,२३० घरांची विक्री २०१७ साली झाली होती. यंदा ती ९,३०१ एवढी वाढली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर, २०२० या ११ महिन्यांतल्या सर्वाधिक गृहविक्रीचा विक्रमही याच महिन्यात नोंदविला गेला.
मुंबईत परवडणाऱ्या घरांची विक्री सर्वाधिक होत आहे. मात्र, उच्चभ्रूंच्या वस्तीतल्या घरांच्या विक्रीचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे मुंबईत विक्री झालेल्या घरांची किंमत १ कोटी ५२ लाख रुपये आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ती किंमत १ लाख ६९ हजार एवढी वाढली होती. तर, ऑगस्ट, २०२० मध्ये ती १ कोटी ३४ लाखांपर्यंत खाली घसरली होती, अशी माहिती मुद्रांक शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून हाती आली आहे.

घरांच्या विक्रीतून गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ५४२ कोटी रुपये जमा झाले होते. सरकारने त्यात सवलत दिल्यामुळे यंदा नोव्हेंबरमध्ये हा महसूल २८८ कोटींपर्यंतच जमा झाला. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सर्वाधिक १०,८६४ घरांची विक्री झाली होती. यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांत अनुक्रमे ११,६४० आणि १४,३९५ घरांची विक्री झाल्याची माहिती प्राॅप टायगर या संस्थेकडून हाती आली आहे.हाती आली आहे.

आर्थिक मंदी पथ्यावर
नोटाबंदी, रेरा आणि जीएसटीमुळे बांधकाम व्यवसायाचा डोलारा डळमळीत झाला होता. कोरोना संकटामुळे हा व्यवसाय डबघाईला आला. जागतिक मंदीमुळे घरांच्या खरेदी-विक्रीवर विपरीत परिणाम होईल आणि हा व्यवसाय कोलमडून पडेल, अशी भीती निर्माण झाली होती. ती टाळण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केली आणि विकासकांनीही घसघशीत सवलती देणे सुरू केले. बँकांचे व्याजदरही कमी झाले. त्यामुळे या व्यवसायात पुन्ही तेजी निर्माण झाली आहे.

Web Title: Record home sales in nine years in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.