लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : वर्ष २०२३ हे लवकरच संपणार आहे. हे वर्ष अनेक विक्रम माेडणारे ठरले आहे. त्यात एका विक्रमाची हमखास भर पडणार आहे, ताे म्हणजे घरविक्रीचा. २००८नंतर यावर्षी घरविक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित हाेऊ शकताे. यावर्षी सुमारे २.६० लाख घरांची विक्री हाेण्याची अपेक्षा आहे.
रिअल इस्टेट सल्लागार संस्था जेएलएल इंडियाने यावर्षीचा आढावा घेणारा अहवाल सादर केला आहे. त्यात म्हटले आहे की, २००८नंतर यंदा आतापर्यंतची सर्वाधिक घरांची विक्री नाेंदविली जाऊ शकते. यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहीतच सरासरीपेक्षा ६५ हजार जास्त घरविक्री झालेली आहे.
काय झाले हाेते २००८मध्ये?
२००८मध्ये जागतिक मंदी आली हाेती. त्यावेळी व्याजदर अतिशय कमी करण्यात आले हाेते. तसेच घरांच्या किमतीही माेठ्या प्रमाणात घटल्या हाेत्या. परिणाम त्यावर्षी माेठ्या प्रमाणात घरांची विक्री झाली हाेती.
...या घरांची सर्वाधिक विक्री
श्रेणी
विक्री
५० ते ७५ लाख रुपये
४५,५९२
१.५ ते ३ काेटी रुपये
४२,९१९
५० लाख रुपयांपेक्षा कमी
३८,३०७
३ काेटी रुपयांपेक्षा जास्त
१४,६२७
...तर आणखी विक्री हाेणार
आरबीआयने सध्या व्याजदर स्थिर ठेवले आहेत. महागाई नियंत्रणात आल्यास पुढील वर्षी व्याजदर घटू शकतात. तसे नव्या वर्षात झाल्यास नवा विक्रम प्रस्थापित हाेऊ शकताे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सामंतक दास यांनी सांगितले.
२,२३,९०५
घरांचे यावर्षी सप्टेंबरपर्यंत नवे लाँचिंग झाले आहे.
१,९६,२२७
घरांची विक्री यावर्षी सप्टेंबरपर्यंत झालेली आहे.