नवी दिल्ली : रशियाकडून हाेणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत माेठी वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये भारताने विक्रमी सरासरी १६.२० लाख बॅरल्स एवढे तेल आयात केले. हे तेल भारताला १५ ते २० डाॅलर्स एवढे स्वस्त मिळत आहे. तरीही तेल कंपन्या पेट्राेल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याच्या तयारीत नाहीत.
गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या तुलनेत यंदा ३५ टक्के जास्त कच्चे तेल रशियातून आयात झाले आहे. त्याचवेळी इराक, साैदी अरब, अमेरिका इत्यादी देशांकडून हाेणारी आयात माेठ्या प्रमाणावर घटली आहे. तेल कंपन्यांनी गेल्या १० महिन्यांपासून पेट्राेल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. युक्रेन युद्ध सुरू झाल्यावेळी कच्च्या तेलाचे दर भडकले हाेते. ताे ताेटा भरून काढण्यात येत आहे. ताे भरून निघाल्यानंतरच पेट्राेल डिझेलचे दर कमी करू, अशी तेल कंपन्यांची भूमिका आहे.