Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाच महिन्यांत सायकलींची विक्रमी विक्री; आरोग्याबाबत जागरूकता

पाच महिन्यांत सायकलींची विक्रमी विक्री; आरोग्याबाबत जागरूकता

पसंतीच्या सायकलसाठी वेटिंग, कोरोनाच्या संकटानंतर देशातील नागरिक आरोग्याबाबत अतिशय जागरूक झालेले दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 03:48 AM2020-10-15T03:48:20+5:302020-10-15T03:48:36+5:30

पसंतीच्या सायकलसाठी वेटिंग, कोरोनाच्या संकटानंतर देशातील नागरिक आरोग्याबाबत अतिशय जागरूक झालेले दिसत आहेत.

Record sales of bicycles in five months; Health awareness | पाच महिन्यांत सायकलींची विक्रमी विक्री; आरोग्याबाबत जागरूकता

पाच महिन्यांत सायकलींची विक्रमी विक्री; आरोग्याबाबत जागरूकता

जयपूर : देशभरात कोरोनाचा कहर सुरू असताना सायकलच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, अनेक शहरांमध्ये आपल्या पसंतीची सायकल मिळविण्यास नागरिकांना वाट बघावी लागल्याची स्थिती आहे.

गेली काही वर्षे देशामध्ये स्वयंचलित वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र यावेळी प्रथमच सायकलच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या पाच महिन्यांत सायकलींच्या विक्रीत दुप्पट वाढ झाल्याचे सांगण्यात येते. लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात देशात एकाही सायकलची विक्री झालेली नाही. मे महिन्यात ४ लाख ५६ हजार, जून महिन्यात ८ लाख ५१ हजार, तर सप्टेंबर महिन्यात ११ लाख २१ हजार ५४४ अशा सायकलींची विक्री झाली आहे. याप्रमाणे मे ते सप्टेंबर या कालावधीमध्ये एकूण ४१ लाख ८० हजार ९४५ सायकलींची विक्री झाली आहे. देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सायकलींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून आली. काही काळ बंद असलेल्या उत्पादनामुळे सायकलींचा स्टॉक कमी झालेला होता. अचानक वाढलेल्या मागणीमुळे कारखान्यांना उत्पादन वाढवावे लागले असले तरी, काही सायकलींसाठी ग्राहकांना मागणी नोंदवून प्रतीक्षा करावी लागत आहे. खास करून गिअरच्या सायकलींना मोठी मागणी आहे.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक
भारत हा जगातील दुसºया क्रमांकाचा सायकल उत्पादक देश असून गेल्या पाच महिन्यांमध्ये येथे मोठ्या प्रमाणावर सायकलची विक्री वाढत असल्याचे दिसून आले आहे. एप्रिल ते सप्टेंबर या काळामध्ये देशामध्ये ४१ लाख, ८० हजार ९४५ सायकलींची विक्री झाली असल्याची माहिती अखिल भारतीय सायकल उत्पादक संघटनेचे सरचिटणीस के. बी. ठाकूर यांनी दिली.

नागरिक आरोग्यदृष्ट्या जागरूक
कोरोनाच्या संकटानंतर देशातील नागरिक आरोग्याबाबत अतिशय जागरूक झालेले दिसत आहेत. सायकलच्या वापरामुळे व्यक्तीची प्रकृती चांगली राहतेच. त्याचबरोबर प्रदूषणरहित वाहनामुळे वातावरणही चांगले राहत असल्याने सायकलींना मागणी वाढल्याचे सांगितले जाते.

Web Title: Record sales of bicycles in five months; Health awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.