नवी दिल्ली : पेट्रोल- डिझेलवरील शुल्कात वाढ करण्यात आल्यामुळे केंद्र सरकारच्या अप्रत्यक्ष करांच्या वसुलीत एप्रिलमध्ये तब्बल ४२ टक्के वाढ झाली आहे.जागतिक वित्तीय सेवा कंपनी डीबीएसने भारतातील अप्रत्यक्ष कराची वसुली चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत अधिक राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. एप्रिल २0१६ मध्ये अप्रत्यक्ष करांची वसुली ४१.८ टक्क्यांनी वाढून ६४,३९४ कोटी रुपयांवर गेली आहे. आधीच्या वर्षी ती ४५,४१७ कोटी रुपये होती. उत्पादन शुल्काची वसुली ७0.७ टक्के वाढून २८,२५२ कोटी झाली. गेल्या वर्षी याच काळात ती १६,५४६ कोटी होती. महसूल वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या अतिरिक्त उपाययोजना वगळल्यास एप्रिलमधील अप्रत्यक्ष करांची वसुली १७ टक्क्यांनी वाढल्याचे दिसते. अतिरिक्त उपायांत वाहन इंधनावरील उत्पादन शुल्कातील वाढीचा समावेश आहे.
अप्रत्यक्ष करांची वसुली वाढली
By admin | Published: May 12, 2016 4:16 AM