Join us

दिवाळखोर ३१७ कंपन्यांच्या पुनर्विक्रीतून २ लाख कोटींची वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 5:52 AM

फक्त ४० टक्के रक्कम मिळाली

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : दिवाळखोरीत गेलेल्या ३१७ खासगी कंपन्यांची पुनर्विक्री करून बँका व वित्तीय संस्थांनी २.०१ लाख कोटी रुपयांची वसुली केली आहे. या कंपन्यांकडून जितके पैसे यायचे होते त्याच्या फक्त ४० टक्केच ही रक्कम आहे. हे सर्व व्यवहार गेल्या ३१ डिसेंबरपर्यंतचे असून ते इनसॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडियाच्या (आयबीबीआय) देखरेखीखाली पार पडले. अवसायानात गेलेल्या कंपन्यांचे व्यवहार आयबीबीआय नियंत्रित करते. त्याचप्रमाणे आणखी ११२६ कंपन्या अवसायानात जाणार आहेत. तसे आदेश आयबीबीआयने दिले आहेत. 

दिवाळखोरीत गेलेल्या ३१७ कंपन्यांकडून वित्तीय संस्था, बँकांना ५.११ लाख कोटी रुपये येणे बाकी होते. मात्र, या कंपन्यांची पुनर्विक्री केल्यानंतर फक्त २.०१ लाख कोटी रुपये मिळाले. येणे असलेल्या पैशाच्या तुलनेत ही रक्कम ३९.३७ टक्के आहे. कंपन्यांच्या अवसायन व दिवाळखोरीसंदर्भात (आयबीसी) जानेवारी २०१७ पासून नवे नियम लागू झाले. तेव्हापासून आजारी कंपनीचे प्रकरण बँका आयबीबीआयकडे नेतात. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार या कंपन्यांची पुनर्विक्री करण्यात येते. ही माहिती केंद्रीय कॉर्पोरेट खात्याने संसदेत नुकतीच दिली. 

२२१ बनावट कंपन्यांची नोंदणीकेवळ कागदावरच असलेल्या सुमारे तीन लाख बनावट कंपन्या गेल्या तीन वर्षांत रद्दबातल करण्यात आल्या आहेत. २२१ बनावट कंपन्यांची स्टॉक एक्सेंजमध्ये नोंदणी करण्यात आली असून, तिथे त्यांचे व्यवहारही होतात, असे निदर्शनाला आले आहे. 

टॅग्स :बँकएमआयडीसी