Lokmat Money > बिझनेस न्यूज > Government Job In Post Office : मोठी बातमी! पोस्टात 10वी पाससाठी भरती; मिळणार 20 हजारांपर्यंत पगार!

Government Job In Post Office : मोठी बातमी! पोस्टात 10वी पाससाठी भरती; मिळणार 20 हजारांपर्यंत पगार!

Government Job In Post Office : सरकारी नोकरी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 02:47 PM2020-02-18T14:47:54+5:302020-02-18T14:50:04+5:30

Government Job In Post Office : सरकारी नोकरी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते.

Recruitment for 10th pass in the post; Up to 20 thousand salary! | Government Job In Post Office : मोठी बातमी! पोस्टात 10वी पाससाठी भरती; मिळणार 20 हजारांपर्यंत पगार!

Government Job In Post Office : मोठी बातमी! पोस्टात 10वी पाससाठी भरती; मिळणार 20 हजारांपर्यंत पगार!

मुंबई: सरकारी नोकरी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी सातत्यानं अनेक तरुण-तरुणी प्रयत्नशील असतात. पोस्टानंही भरती सुरू केली आहे. भारतीय टपाल खात्यात दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्यांपासून पदवीधारकांपर्यंत विविध पदांवर भरती केली जात आहे. चालक, ज्युनिअर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमन या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 मार्च 2020 आहे. येथे क्लिक करा...

पोस्टात चालकच्या 14 पदांसाठी नोकरभरती असून, या पदांसाठी आवश्यक वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी 19,900 रुपये प्रतिमहिना वेतन आहे. क्रीडा कोट्यातून ज्युनिअर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमन पदांवर नोकरभरती होणार आहे. परंतु ही भरती टपाल खात्याच्या कर्नाटक क्षेत्रात निघाली आहे. पोस्टमन पदासाठी 12वी उत्तीर्ण आणि ज्युनिअर अकाउंटंट पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 फेब्रुवारी देण्यात आली आहे. येथे क्लिक करा...  

Web Title: Recruitment for 10th pass in the post; Up to 20 thousand salary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.