अकोला : महावितरणतर्फे विविध संवर्गातील १६८४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी १ लाख ७५ हजार २७५ उमेदवारांनी अर्ज केले असून, त्यांची आॅनलाईन परीक्षा १ नोव्हेंबरपासून राज्यातील विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे.
महावितरणच्या सर्व परिमंडळांतर्गत रिक्त असलेल्या जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यात कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता, सहायक दक्षता अधिकारी आणि कनिष्ठ सहायक (लेखा) आदी पदांचा समावेश आहे. या संवर्गातील एकूण १६८४ पदांसाठी आॅनलाईन परीक्षा घेतली जात आहे. त्याचे वेळापत्रक महावितरणतर्फे जाहीर करण्यात आले असल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली. या परीक्षेबाबतची संपूर्ण माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर देण्यात आली असून, परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येणार आहे. (प्रतिनिधी)
महावितरणमध्ये १६८४ पदांसाठी पुढील महिन्यात होणार भरती
महावितरणतर्फे विविध संवर्गातील १६८४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी १ लाख ७५ हजार २७५ उमेदवारांनी अर्ज केले असून
By admin | Published: October 27, 2015 11:17 PM2015-10-27T23:17:08+5:302015-10-27T23:17:08+5:30