मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत केलेल्या घोटाळ्याप्रकरणी इंटरपोलने उद्योगपती मेहुल चोक्सीविरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावली आहे. मेहुल चोक्सी हा नीरव मोदीचा मामा असून तो अँटिग्वामध्ये असल्याचे समोर आले आहे. त्याला तेथून हुडकून काढण्याचे इंटरपोलसमोर आव्हान आहे.नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांनी ‘लेटर आॅफ अंडरटेकिंग’द्वारे (एलओयू) पंजाब नॅशनल बँकेतून १४ हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळवले. ते न फेडता जानेवारीमध्ये दोघांनीही कुटुंबासह भारतातून पळ काढला. फेब्रुवारीमध्ये घोटाळा उघडकीस आल्यावर सीबीआय व ईडी या दोघांनी तपास सुरू केला. आता सीबीआयच्या विनंतीवरुन इंटरपोलने चोक्सीविरोधात नोटीस बजावली आहे.
इंटरपोलची चोक्सीविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 5:22 AM