नवी दिल्ली-
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सीतारामन यांनी परिधान केलेल्या साडीनं सर्वांचं लक्ष वेधलं. सीतारामन यांनी लाल रंगाला प्राधान्य दिलं. ज्यावर काळ्या आणि सोनेरी रंगाची बॉर्ड होती. दरवेळीप्रमाणे याही वेळेस सीतारामन यांच्या पेहरावामध्ये साधेपणा दिसून येत असला तरी त्यांची साडी स्वस्त नाही. भारतीय पारंपारिक लूक आणि विशेषतः हातमागाच्या साड्यांवरील सीतारामन यांचं प्रेम आजवर लपून राहिलेलं नाही.
सीतारामन यांनी आज जी साडी नेसली होती तिला 'रेड टेंपल' साडी असं म्हणतात. ही कांचीपुरम साडींपैकी एक आहे. या साडीची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. साडीच्या रंगापासून ते बॉर्डर आणि छापील डिझाइनपर्यंत, या साडीमध्ये लक्षवेधून घेणाऱ्या गोष्टी आहेत. या साडीला भारतात एक इतिहास आहे. आपल्या खास वैशिष्ट्यांमुळे ही साडी भारतीय महिलांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे.
साडी नेमकी कुठली?
रेड टेंपल साडीचे मूळ दक्षिण भारतात आहे. विशेषतः तामिळनाडूतून या साडीला कांचीपुरम किंवा कांजीवरम साडी असेही म्हटले जाते. कारण ती कांचीपुरम मंदिराच्या शहराशी संबंधित आहे. कांचीपुरम हे शहर रेशीम साड्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि रेड टेंपल साडीला सर्वात जास्त मागणी आहे. कांचीपुरम साड्यांचा ट्रेंड खूप जुना आहे आणि खास गोष्ट म्हणजे ती कधीही 'आऊट ऑफ फॅशन' होत नाही.
लाल रंग सौभ्याग्य लक्षण
रेड टेंपल साडी तिच्या विशिष्ट लाल रंगासाठी ओळखली जाते. हिंदू संस्कृतीत लाल रंगाला खूप महत्त्व आहे. हा रंग शक्ती, सामर्थ्य आणि सौभाग्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. लग्न, विशेष प्रसंगी आणि सण-समारंभात ही नेसणं खूप खास मानलं जातं. लाल रंग वाईटापासून दूर ठेवतो आणि गुड लक मानला जातो.
कशी तयार होते साडी?
रेड टेंपल साडी शुद्ध रेशमी धाग्यापासून बनविली जाते. दक्षिण भारत आणि गुजरातमधून या साड्यांच्या विणकामात जरी आणि रेशमी धाग्यांचा विशेष वापर केला जातो. यामध्ये, रेशमी धाग्यांचा वापर केला जातो जो त्यांच्या मऊपणा, चमक आणि टिकाऊपणासाठी ओळखला जातो.
या साड्यांमध्ये सुंदर रंग वापरले आहेत. साडीचे फॅब्रिक खूप हलके आणि ब्रेथेबल आहे, जे उन्हाळ्यात अतिशय आरामदायक ठरते. ही साडी कुशल कारागीर हाताने विणून तयार करतात. साडीची बॉर्डर स्वतंत्रपणे विणलेली असते. म्हणूनच एक साडी बनवायला बरेच दिवस लागतात.
सोनं-चांदीचं नक्षीकाम
रेड टेंपल साड्या अनोख्या डिझाइन्ससाठी ओळखल्या जातात. कांचीपुरमच्या साड्यांमध्ये त्याची खास ओळख आहे. साडी उत्कृष्ट कारागिरीसाठी आणि डिझाइनच्या विस्तृत श्रेणीसाठी ओळखली जाते. या साड्यांना जरी वर्क, पल्लू आणि ब्लाउज मोहिनीसह सुंदर किनार आहे. ज्यावर सोनं किंवा चांदीचे नक्षीकाम केले जाते. साडीवरील डिझाइन हिंदू पौराणिक कथांपासून प्रेरित आहे. ही साडी परिधान करणाऱ्याच्या आयुष्यात सौभाग्य आणि समृद्धी आणते असे म्हटले जाते.
पूजा आणि लग्नापासून ते खास प्रसंगी रेड टेंपल साडीला प्राधान्य
रेड टेंपल साडी साधेपणातील मनमोहन डिझाइनमुळे भारतीय महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ही साडी अनेक खास प्रसंगी नेसली जाते. पूजा, सण आणि लग्न समारंभांव्यतिरिक्त अनेक औपचारिक कार्यक्रमांमध्ये ती परिधान करण्यास प्राधान्य दिलं जातं. मात्र, साडीची देखभाल विशेष पद्धतीनं करावी लागते. ती थेट सूर्यप्रकाशापासून आणि आर्द्रतेपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पाण्यात धुण्यामुळे रंग खराब होऊ शकतो, म्हणून ती कोरडीच स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो. रेड टेंपल साड्यांची लोकप्रियता त्यांच्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासामुळे आणि सुंदर डिझाइनमुळे प्रचंड आहे.