Join us

नगदी पिकांखालील क्षेत्र कमी करा - खडसे

By admin | Published: May 14, 2016 2:12 AM

लहरी हवामान आणि राज्यात वारंवार पडणारा दुष्काळ विचारात घेऊन जास्त पाणी घेणाऱ्या नगदी पिकांचे क्षेत्र कमी करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना राज्याचे महसूल आणि कृषीमंत्री एकनाथ खडसे

पुणे : लहरी हवामान आणि राज्यात वारंवार पडणारा दुष्काळ विचारात घेऊन जास्त पाणी घेणाऱ्या नगदी पिकांचे क्षेत्र कमी करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना राज्याचे महसूल आणि कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या. ऊस, केळी ही पिके ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी ठोस प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले.कृषी विभागाची राज्यस्तरीय आढावा बैठक शुक्रवारी मध्यवर्ती इमारतीतील कृषी विभागाच्या सभागृहात खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला कृषी राज्यमंत्री राम शिंदे, कृषी शिक्षण आणि संशोधन महाराष्ट्र परिषदेचे उपाध्यक्ष राम खर्चे, कृषी आयुक्त विकास देशमुख, पशुसंवर्धन आयुक्त व्ही. जे. भोसले यांच्यासह विविध प्रकल्प, महामंडळाचे संचालक, अधिकारी उपस्थित होते.खडसे म्हणाले, की ऊस पिक ठिबक सिंचनाखाली आणण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने तयार केला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. राज्यातच नाही तर देशभरात सध्या तूर आणि कडधान्यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात या पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.