वॉशिंग्टन : ‘तेलाचे दर तत्काळ कमी करा. ते आणखी वाढवू नका. अन्यथा अमेरिका तुम्हाला चांगलेच लक्षात ठेवेल,’ असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल उत्पादक देशांना (ओपेक) दिला.
आॅगस्ट महिन्यात ७० ते ७२ डॉलर प्रति बॅरल असलेले कच्च्या तेलाचे दर आता ८० डॉलरवर गेले. ओपेक देशांच्या प्रतिनिधींची अल्जेरियामध्ये महत्त्वाची बैठकही सुरू झाली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ट्विटरवरून तेल उत्पादकांना इशारा दिला आहे.
‘तेलाचे उत्पादन करणाऱ्या आखाती देशांचे आम्ही कायम संरक्षण केले आहे. आमच्याशिवाय ते पूर्णपणे असुरक्षित आहेत. तसे असतानाही त्यांच्याकडून तेलाच्या दरात वारंवार वाढ होत आहे. ओपेकची ही मक्तेदारी आहे,’ असे ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
तेलाच्या उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय ओपेक देशांनी जूनमध्ये घेतला होता. उत्पादनात वाढ झाली की दर कमी होतील, असे त्यांनी जूनच्या बैठकीत म्हटले होते. पण जून ते सप्टेंबरदरम्यान तेलाचे दर कमी झालेले नाहीत. (वृत्तसंस्था)
कच्च्या तेलाचे दर कमी करा, ट्रम्प यांचा इशारा
‘तेलाचे दर तत्काळ कमी करा. ते आणखी वाढवू नका. अन्यथा अमेरिका तुम्हाला चांगलेच लक्षात ठेवेल,’ असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल उत्पादक देशांना (ओपेक) दिला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 04:05 AM2018-09-21T04:05:53+5:302018-09-21T04:05:56+5:30