Lokmat Money > बिझनेस न्यूज > इलेक्ट्रिक उपकरणांवरील जीएसटी कमी करा

इलेक्ट्रिक उपकरणांवरील जीएसटी कमी करा

वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आल्यानंतर करप्रणाली सुटसुटीत होणार असली, तरीही काही लघु-सूक्ष्म उद्योगांवरील

By admin | Published: June 1, 2017 12:39 AM2017-06-01T00:39:02+5:302017-06-01T00:39:02+5:30

वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आल्यानंतर करप्रणाली सुटसुटीत होणार असली, तरीही काही लघु-सूक्ष्म उद्योगांवरील

Reduce GSTs on electric appliances | इलेक्ट्रिक उपकरणांवरील जीएसटी कमी करा

इलेक्ट्रिक उपकरणांवरील जीएसटी कमी करा

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आल्यानंतर करप्रणाली सुटसुटीत होणार असली, तरीही काही लघु-सूक्ष्म उद्योगांवरील कराचा भार वाढणार आहे. स्वीचसारखी लहान-सहान इलेक्ट्रिक उपकरणे, तसेच सर्किट्स सुरक्षितता
देणाऱ्या उपकरणांवर तब्बल
२८ टक्के जीएसटी प्रस्तावित आहे. मात्र, कराचा इतका मोठा बोजा पडल्यास ही उपकरणे तयार करणारे लघुउद्योग जगू शकत नाहीत. त्यामुळे हा कर १२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यावा, असे आवाहन वेस्टर्न इंडिया इलेक्ट्रिकल एक्सेसरीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने केले आहे.इलेक्ट्रिक उपकरणांना चैनीच्या वस्तूंच्या यादीत टाकण्यात आल्यामुळे त्यावर जबर कर बसणार आहे.
वस्तुत: ही उपकरणे बनविणाऱ्या लघु व सूक्ष्म उद्योगांतून प्रामुख्याने अकुशल कामगार आणि महिलांना रोजगार मिळतो. हे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी सुमारे ५० हजार कोटींचे योगदान देतात.  यावर २८ टक्के जीएसटी लावण्यात आल्यास हे लघुउद्योग नष्ट होतील आणि या वस्तूंची आयात परदेशातून करावी लागेल, असे असोसिएशनने केंद्र शासनाला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Reduce GSTs on electric appliances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.